२० हजारांची लाच स्वीकारताना हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

एका गुन्ह्यात मदत करून त्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोणंद पोलीस ठाण्यातील हवालदाराच्या रंगेहाथ पकडले. भगवान किसन पवार असे संबंधित हवालदाराचे नाव आहे.

    सातारा : एका गुन्ह्यात मदत करून त्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोणंद पोलीस ठाण्यातील हवालदाराच्या रंगेहाथ पकडले. भगवान किसन पवार असे संबंधित हवालदाराचे नाव आहे.

    याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार व त्यांचे भाऊ यांना पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात मदत करून त्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तक्रारदाराकडे संबंधित हवालदाराने वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हवालदारास रंगेहात पकडले. भगवान किसन पवार असे हवालदाराचे नाव आहे.

    ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, संभाजी काटकर, निलेश वायदंडे, निलेश येवले इत्यादींनी कारवाईत भाग घेतला.