दुर्घटनाग्रस्त सुतार कुटुंबियांना बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पाच लाखांची मदत

भास्कर सुतार यांनी आपल्यावर आलेला भीषण प्रसंग त्यांनी भाजपा महाराष्ट्र सचिव प्रदेश सौ. शिल्पा मराठे यांच्याशी बोलून मदतीसाठी आवाहन केले.

    राजापूर तालुक्यातील मुर गावचे रहिवासी भाजपा पूर्व विभागाचे तालुका अध्यक्ष भास्कर सुतार यांच्या आजीवली येथील सॉ मिलला लागलेल्या भीषण आगीत सॉ मिल आणि चिरकामासाठी असलेली लाकडे, मशिनरीत जळून खाक झाली. आगीत भास्मसात झालेल्या या प्रसंगाने सुतार कुटुंबीयांन वर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रसंगात मदतीला धावून येत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तातडीने पाच लाख रूपयांची मदत सुतार कुटुंबियांना करत दिलासा दिला आहे.

    भास्कर सुतार यांनी आपल्यावर आलेला भीषण प्रसंग त्यांनी भाजपा महाराष्ट्र सचिव प्रदेश सौ. शिल्पा मराठे यांच्याशी बोलून मदतीसाठी आवाहन केले. शिल्पा मराठे यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्याकडे भास्कर सुतार यांना साहेबांकडून आर्थिक मदतीची मागणी केली. पटवर्धन यांनी तातडीने ही बाब बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना सांगितली. काही वेळात आपल्याकडे मदत पोच होईल ती रात्री उशिर झाला तरी भास्कर सुतार यांना पोच करावी व माझ्याशी त्यांचे बोलणे करून घ्यावे अशी सूचना केली. सौ. मराठे यांनी रात्री सुतार कुटुंबियांची भेट घेऊन रूपये पाच लाखाची मदत श्री. सुतार यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी भ्रमणध्वनीवर आपल्या कार्यकर्त्यावर आलेल्या प्रसंगीची माहिती घेत नाम. मंत्री चव्हाण यांनी भास्कर सुतार कुटुंबियांना धीर दिला. नाम. चव्हाण यांनी दिलेल्या मदतीबद्दल तसेच त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सौ.मराठे यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.