श्रेय घेण्यासाठी आदित्य ठाकरे टीका करत असतात – बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना मिळण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा-रवींद्र चव्हाण (सार्वजनिक बांधकाम मंत्री) डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदानात आज विकसित भारत संकल्प यात्रेस सुरुवात झाली.

    कल्याण : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. डोंबिवलीत विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री, माजी नगरसेवक शैलेश धात्रक माजी नगरसेवक विकास म्हात्रे, महापालिका अधिकारी, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

    दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होऊन देखील केवळ व्हीआयपीच्या अभावी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचे टीका केली होती. याबाबत बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आदित्य ठाकरे अशा प्रकारची टीकेचे श्रेय घेण्यासाठी करत असल्याचे सांगितले. रेल्वेच्या योजनांमध्ये पन्नास टक्के हिस्सा जो राज्य शासनाने द्यायला पाहिजे होता तो गेला अडीच वर्षाच्या सरकारमध्ये दिला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कामं मागे राहिली राहिली होती. या सरकारने तो हिस्सा दिलाय त्यामुळे याचे उद्घाटन केलं नाही अशा गोष्टी करणे अयोग्य आहे. एकदा प्रकल्प ज्यावेळेला पूर्णत्वाकडे जात असतो त्यावेळेला पद्धत सुरू झाली आहे, काम ज्या वेळेला पूर्ण होतं त्यावेळेला कुठेतरी श्रेय कोणाला मिळावा यासाठी श्रेयाची लढाई हे प्रत्येक जण करत असतात. त्यामध्ये कदाचित आदित्य ठाकरे पण उतरलेत का असं मला वाटायला लागले. आदित्य ठाकरे अशा प्रकारची टीका श्रेय घेण्यासाठी करत असल्याचा टोला लगावला आहे.

    केंद्र सरकारच्या विविध योजनांचा ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना मिळण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा-रवींद्र चव्हाण (सार्वजनिक बांधकाम मंत्री) डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदानात आज विकसित भारत संकल्प यात्रेस सुरुवात झाली. या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना मिळण्याच्या हेतूने तसेच केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांच्या जनजागृतीसाठी विकसित भारत संकल्प यात्रेस सुरुवात करण्यात आली. या यात्रेला देशातील नागरिकांकडून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे.