महापुरुषांच्या अवमान प्रकरण-सीमावादात मास्टरमाईंड कोण?, अजित पवारांचा महामोर्चात सवाल, अवमान प्रकरणात हिवाळी अधिवेशनात..

महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला भायखळ्यामधून सुरुवात झाली असून मोर्चात विरोधी पक्षनेते अजित पवार कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच नेते सहभागी झाले आहेत. या मोर्चात अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला.

    मुंबई : महापुरुषांबाबत सातत्याने होण्याऱ्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल आज महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला भायखळ्यामधून सुरुवात झाली असून मोर्चात विरोधी पक्षनेते अजित पवार कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच नेते सहभागी झाले आहेत. या मोर्चात अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला.

    अजित पवार म्महणाले, हाराष्ट्र द्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी, हा मोर्चा आयोजित केलाय. महाराष्ट्राच्या मातीला भाऊबंदकीचा शाप असला तरी संकटाच्या वेळी महाराष्ट्र एकजूट होऊन उत्तर दिल्याशिवाय राहत नाही, हा विराट भव्य मोर्चा याचं प्रतिक आहे. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना उत्तर द्यायलाच हवं. अशी टीका पवार यांनी केली.

    महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा मास्टरमाईंड कोण आहे
    वारंवार भाजपा नेत्यांकडून चूक का होतेय. भाजपाच्या नेत्यांना मनाची नाही, जनाची काही वाटायला पाहिजे. वारंवार बंदचा फटका सगळ्यांना बसतोय, पण ही गरज आहे. या मोर्चाने राज्यकर्त्यांना धडकी बसल्याशिवाय राहणार नाही, राज्यपालांना हटवलं गेलंच पाहिजे. अशा वक्तव्यांचा पुनरुच्चार होऊ नये यासाठी अधिवेशनात कायदा करा अशी मागणी अजित पवार यांनी केली.

    सगळे विरोधक यासाठी प्रयत्न करतील. सीमावादाचं टूल किट कुणी दिलं, हे शोधायला हवं. एकसंध महाराष्ट्रातील गावं तेलंगणा, कर्नाटक, गुजरातेत जाण्याची भाषा एकदम कशी करते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली पण रान कुणी उठवलं, हे कदापी सहन करणार नाही. शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून महापुरुषांचा अवमान, गावं बाहेर चाललीत. फेक ट्विट असतील तर कुणी फूस लावली, हे समोर यायला पाहिजे. कर्नाटक बँकेत खाती काढायला सांगतायेत, हे पुतना मावशीचं प्रेम आहे. सरकारचे चुकीचे निर्णय होतात, ते रोखण्यासाठी एकत्र यायला हवं. बेरोजगारी वाढली हा कुणाचा दोष आहे. असा सवाल करत अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला.