साताऱ्याच्या विकासात कला वाणिज्य महाविद्यालयाचे योगदान आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

कै. शरदराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

  सातारा : किशोर बेडकिहाळ यांना ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान सातारा शहर व परिसराच्या शैक्षणिक सामाजिक विकासात सातारा मराठा विद्या प्रसारक सातारा : समाजाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे भरीव योगदान असल्याचे प्रतिपादन आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, कला व वाणिज्य महाविद्यालय व दुवुस्कर कुटुंबीयातर्फे देण्यात येणारा ‘रावबहाद्दूर संभाजीराव मोरे दुदुस्कर सामाजिक कृतक्षता पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत व लेखक किशोर बेडकिहाळ यांना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सातारा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी चेअरमन कै. शरदराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन जयेंद्र चव्हाण, प्र. प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड, सौरभ शिंदे, माजी नगरसेवक जयवंत भोसले, अविनाश कदम, अमोल मोहिते, पत्रकार विनोद कुलकर्णी, हरिष पाटणे, शरद काटकर, आनंदराव कणसे, फिरोज पठाण, शकील बागवान यांच्यासह संस्थेचे सचिव मिलिंद घाडगे, खजिनदार आनंद कदम, निलेश पुस्कर आदि मान्यवर उपस्थित होते. –

  जा. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातान्याच्या शैक्षणिक इतिहासात कला व वाणिज्य महाविद्यालायचे भरीव योगदान आहे. सातारा परिसरातील डोंगर दन्यात राहणान्या सर्वसामान्य गरीब, होतकरू विद्याथ्र्यांना घडविण्याचे मोलाचे कार्य या महाविद्यालयाने केले आहे. संस्थेचे माजी चेअरमन के शरदराव चव्हाण यांनी संस्था व महाविद्यालयाच्या विकासासाठी मोलाचे कार्य केले आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीचा त्यांनी कायम ध्यास घेतला होता. आज महाविद्यालयाची वाढलेली गुणवत्ता व या परिसराचा झालेला विकास हे त्यांच्या दूरदृष्टीचे यश आहे. या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक के. रावबहाद्दूर संभाजीराव मोरे दुदुस्कर यांच्या नांवाने दिला जाणारा ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत व लेखक किशोर बेडकिहाळ यांना माझ्या हस्ते प्रदान करणे म्हणजे माझ्यादृष्टीने मोलाचे आहे. किशोर बेडकिहाळ यांच्या लेखनाचा व विचारांचा समाजाला निश्चितच फायदा होणार आहे. या महाविद्यालयाची व संस्थेची अशीच भरभराट व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

  यावेळी संस्थेचे चेअरमन जयेंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात संस्था व महाविद्यालयाच्या इतिहासाचा व प्रगतीचा आढावा घेतला. कै. शरदराव चव्हाण (काका) यांनी संस्था व महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट केले. आज महाविद्यालयाच्या इमारतीचा विस्तार व झालेली शैक्षणिक प्रगती हे सर्व काकांच्या स्वप्नांचे व कष्टाचा परिपाक आहे. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व भक्कम आधार यामुळे आजचे प्रगतीचे चित्र दिसत आहे. काकांनी संस्थेच्या चेंजरमन पदाची धुरा सांभाळताना केलेले काम आजसुध्दा आमच्यासमोर दिशादर्शक असल्याचे सांगून, त्याच मार्गाने संस्था व महाविद्यालयाची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले, प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्था व महाविद्यालयाच्या प्रगतीचा । आढावा घेतला. संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सामाजिक कृतज्ञता पुरस्कारा मागची भूमिका त्यांनी सांगितले. ते म्हणाले, माजी चेअरमन के शरदराव चव्हाण (काका) व विद्यमान चेअरमन जयेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयाची प्रगती होत आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात कला व वाणिज्य महाविद्यालयाचा नावलौकिक असल्याचे त्यांनी सांगितले.

  प्रारंभी सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, कला व वाणिज्य महाविद्यालय व दुदुस्कर कुटुंबियांतर्फे देण्यात येणारा ‘रावबहाद्दूर संभाजीराव मोरे दुवुस्कर सामाजिक कृतधाता पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, लेखक, विचारवंत श्री. किशोर बेडकिहाळ यांना आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व सन्मानचिन्ह असे होते. मानपत्राचे वाचन डॉ. भरत जाधव यांनी केले.

  यावेळी संस्था व महाविद्यालयातील गुणवंताचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित शेख व आभार नवनिता दुदुस्कर पटेल यांनी मानले. कार्यक्रमास सातारा शहर व परिसरातील नागरिक प्राध्यापक, विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.