
गुजरातमधील दंगलीवर आधारित बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून (BBC Documentary) देशातील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संघटनांमध्ये चांगलाच संघर्ष होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील (PM Narendra Modi) माहितीपटाचे जेएनयू (JNU) आणि जामिया विद्यापीठात (Jamia University) झालेल्या स्क्रीनिंगवरुन गदारोळ उडाला आहे.
पुणे : गुजरातमधील दंगलीवर आधारित बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून (BBC Documentary) देशातील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संघटनांमध्ये चांगलाच संघर्ष होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील (PM Narendra Modi) माहितीपटाचे जेएनयू (JNU) आणि जामिया विद्यापीठात (Jamia University) झालेल्या स्क्रीनिंगवरुन गदारोळ उडाला आहे. एफटीआयआयमध्येही ही डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणाची एफटीआयआयच्या प्रशासनाकडून चौकशी केली जाणार असून, या चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून प्रचंड विवाद, संघर्ष होताना दिसत आहे. ही डॉक्युमेंट्री पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्येही दाखवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) आणि जामिया विद्यापीठात झालेल्या वादानंतर दिल्ली विद्यापीठातही विद्यार्थी संघटनांमध्ये राडा झाला. आता याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटण्याची शक्यता आहे. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये हा माहितीपट दाखवल्याने अखिल भारतीय युवा मोर्चाने आंदोलन केले होते. त्यानंतर हा माहितीपट आता पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमध्येही (FTII) मध्येही दाखवण्यात आल्याने हा वाद आता पुन्हा वाढणार आहे.
एफटीआय प्रशासन करणार चौकशी
बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून प्रचंड विवाद होताना दिसत आहे. याप्रकरणी एफटीआयआयच्या प्रशासनाने सदर घटनेची अंर्तगत चौकशी करुन जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भाजपकडून प्रचंड विरोध
बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रिनिंगची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून विरोध करण्यात येत होता. मात्र, विद्यार्थी संघटनांनी भाजपचा विरोध झुगारून लावत या डॉक्युमेंट्रीचं स्क्रिनिंग केलं. त्यानंतर आता पुन्हा हे प्रकरण पेटण्याची शक्यता असून, या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर कारवाई होईल, असे सांगण्यात येत आहे.