संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

आयआयटी पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे देशात दोन गट पडलेले असतानाच मुंबई आयआयटीत (Mumbai IIT) हमासला पाठिंबा देणारे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याने वादाची ठिणगी पडली आहे.

    मुंबई : आयआयटी पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे देशात दोन गट पडलेले असतानाच मुंबई आयआयटीत (Mumbai IIT) हमासला पाठिंबा देणारे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याने वादाची ठिणगी पडली आहे. विवेक विचार मंच या संघटनेने या विरोधात जोरदार निदर्शने केली. आयआयटी कॅम्पसमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

    विद्यार्थ्यांच्या एका गटाचा त्यास तीव्र विरोध होता. तर, दुसऱ्या गट व्याख्यान आयोजित करण्यावर ठाम होता. अखेर हा कार्यक्रम झाला. अनेक विद्यार्थी दिवाळी सुटीसाठी घरी परतल्याने व्याख्यानाला तुरळक गर्दी होती. मात्र, या व्याख्यानावरून वाद सुरू झाला आहे. व्याख्यात्यांनी आपल्या व्याख्यानातून दहशतवादी संघटना हमासचं समर्थन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी असून, शनिवारी आयआयटीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.

    स्वातंत्र्यलढ्याशी तुलना

    पॅलेस्टाईनचा लढा हा स्वातंत्र्याचा लढा आहे. जगाच्या इतिहासात, वसाहतवादाच्या इतिहासात असा संघर्ष कधीही झालेला नाही, जो पूर्णपणे 100 टक्के अहिंसक असेल. भारतीय स्वातंत्र्याचा लढा शंभर टक्के अहिंसक वगैरे नव्हता, असेही देशपांडे केला यांनी म्हटल्याचा विद्यार्थ्यांचा मुख्य आरोप आहे.

    प्रशासकाने दखलच घेतली नसल्याचा आरोप

    6 नोव्हेंबरला पॅलेस्टाइनवरचा एक चित्रपट अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दाखवण्यात आला. त्यानंतर देशपांडे नावाच्या व्यक्तीला वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाआधी आम्ही त्यांची भेट घेतली. भाषणाला आक्षेप घेतला. पण आयआयटी प्रशासनाने आमच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.