मंडणगडमध्ये कोरोनाचा कहर! कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क; नागरिकांना नियम पाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटचा प्रसार रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे धोरणानुसार तालुक्यात उपाय योजना सुरु झाल्या आहे. दरम्यान गेल्या वर्षभरात मास्कसह कोरोनाचे सर्व नियम तालुक्यातही शिथिल करण्यात आले आहेत.

    मंडणगड : कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाच्या चौथ्या टप्प्याला (4th Stage) सुरुवात झाल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा (Health Department) या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी नव्याने सतर्क (Alert) झाली आहे. २८ डिसेंबर २०२२ अखेर तालुक्यात कोविड लसीकरण मोहिमेत तालुक्यातील ४१४३८ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे.

    ३३७६४ नागरिकांना दुसरा डोस (Second Dose) ५४८४ नागरिकांना बुस्टर डोस (Booster Dose) देण्यात आला आहे. तालुक्यात आज अखेर १३७१ नागरिक कोरोना बाधित झाले आहेत. यातील १३५३ कोरोना बाधित नागरिक बरे झाले असून कोरोनामुळे १८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

    चौथ्या टप्यात आरोग्य विभागाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्कतेने काम कारीत आहे. कोरोना बाधित मयत रुग्णाचे संपर्कातील २६ जणांचे नुमने कोरोना चाचणीकरिता पाठविण्यात आले आहेत.

    कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटचा प्रसार रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे धोरणानुसार तालुक्यात उपाय योजना सुरु झाल्या आहे. दरम्यान गेल्या वर्षभरात मास्कसह कोरोनाचे सर्व नियम तालुक्यातही शिथिल करण्यात आले आहेत त्यामुळे जनजीवन विशेषता कोरोनामुळे विस्कटलेली अर्थकारणाची गाडी हळहळू पूर्वपदावर येऊ लागलेली आहे.

    नागरिकांना सतर्क राहून काम करण्याची गरज असून कोरोनाच्या नवीन विषाणूचा जागतिक पातळीवर झपाट्याने प्रसार होत असल्याने नागरिकांनी दुर्लक्ष न करता आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार वाटचाल करण्याच्या सूचना मिळत आहेत.