देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक! महाराष्ट्रात संसर्गाचा वेग अधिक; मुंबई-ठाण्यातील रुग्णसंख्या धडकी भरवणारी

देशात गत काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पुन्हा एकदा सर्व राज्यांचा उद्देशून पत्र लिहिले आहे. यात त्यांनी वाढत्या कोरोना रूग्णसंख्येत गाफील राहू नका, अशा सूचना दिल्या आहेत(Corona outbreak in the country again). 

  दिल्ली : देशात गत काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पुन्हा एकदा सर्व राज्यांचा उद्देशून पत्र लिहिले आहे. यात त्यांनी वाढत्या कोरोना रूग्णसंख्येत गाफील राहू नका, अशा सूचना दिल्या आहेत(Corona outbreak in the country again).

  मागील दोन आठवड्यांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गाफील राहू नये आणि परिस्थिती हलक्यात घेऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जसे आपण आत्तापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करत आलो आहोत, तशाच उपाययोजना आताही सर्वच राज्यांना राबवाव्या करावे लागतील, असेही भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे. .

  महाराष्ट्रात संसर्गाचा वेग अधिक

  महाराष्ट्रात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा वेग अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यात गत 24 तासांत कोरोनाचे 2,813 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका बाधिताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गत काही दिवसांपासून महाराष्ट्रातील संसर्गाचे प्रमाणही झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रूग्णांची नोंद मुंबई आणि त्यापाठोपाठ ठाण्यात करण्यात आली आहे. मुंबईत गत 24 तासांत कोरोनाचे 1702 नवीन रुग्ण आढळले आहेत.

  24 तासांत 7240 नवीन रुग्ण

  देशात गत 24 तासांत कोरोनाचे 7240 नवीन रुग्ण आढळले आहेत. बुधवारी देशात 5233 नवे रुग्ण आढळले होते. याच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी 3741 नवे बाधित आढळले होते. त्यानंतर देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बुधवारी 94 दिवसांनंतर देशातील नवीन बाधितांची संख्या 5000 च्या पुढे गेली आहे.

  जुनमध्ये दररोज अडीचपट वाढ

  भारतात कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती बसली आहे. दरम्यान, केंद्राकडून पाच राज्यांना पत्रही लिहण्यात आले आहे. केंद्र सरकार ज्या राज्यांवर बारकाईने लक्ष ठेवत आहे त्यात महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.

  पाच राज्ये केंद्राच्या देखरेखीखाली

  भारतातील कोरोनामुळे परिस्थिती कशी बिकट होत चालली आहे. विविध राज्यांमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. 31 मे ते 6 जूनपर्यंतच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असे समोर आले आहे की, सध्या चार राज्यांतील 12 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण 10 टक्के किंवा त्याहून अधिक आहे. सर्वात चिंतेची गोष्ट हिमाचल प्रदेशची आहे, जिथे लाहौल स्पितीमध्ये सकारात्मकता दर 44.44 टक्के आहे. त्याचवेळी, केरळमधील जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण लाहौल स्पितीच्या तुलनेत खूपच कमी आहे, परंतु येथे कोरोनाचा प्रभाव पाच जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. याशिवाय मुंबई, महाराष्ट्रातील संसर्गाचे प्रमाण यावेळी 10.78 टक्क्यांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, मिझोराममधील पाच जिल्ह्यांमध्ये सकारात्मकता दर पाच टक्क्यांहून अधिक आहे.