चिंताजनक – राज्यात दिवसभरात ४१६५ रुग्णांची नोंद, सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला चार हजारचा टप्पा

राज्यात ४१६५ रुग्णांची (Maharashtra Corona Update) नोंद झाली आहे. यातील २२५५ रुग्ण हे मुंबईतील (Mumbai) आहेत. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.

    मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत (Corona Patient) वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्या ही चार हजारच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी राज्यात ४१६५ रुग्णांची (Maharashtra Corona Update) नोंद झाली आहे. यातील २२५५ रुग्ण हे मुंबईतील (Mumbai) आहेत. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.

    आज राज्यात ४१६५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ३०४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. आज मुंबईत आज २२५५ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनामुळे तीन मृत्यू झाले आहेत.

    राज्यात आज एकूण ३०४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ७७,५८,२३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७. ८६ टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज तीन कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा १.८६ टक्के इतका झाला आहे.

    राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढत आहे. राज्यात आज एकूण २१७४९ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सर्वाधिक म्हणजे १३३०४ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल ठाण्यामध्ये ४४४२ इतके सक्रिय रुग्ण आहेत.