राज्याचा रिकव्हरी रेट पोहोचला ९३.२४ टक्क्यांवर,रुग्णसंख्याही होतेय कमी – जाणून घ्या आजची आकडेवारी

राज्यात आजपर्यंत एकूण ५३,०७,८७४ कोरोनाबाधित रुग्ण(Corona Patients) बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२४% (Corona Recovery Rate) एवढे झाले आहे.

    मुंबई: आज राज्यात २०,७४० नवीन कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित (Corona Patients in Maharashtra) रुग्णांची एकूण संख्या ५६,९२,९२० झाली आहे. आज ३१,६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,०७,८७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२४% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,८९,०८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात आज ४२४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ४२४ मृत्यूंपैकी २९१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ५४९ ने वाढली आहे.

    chart

    हे ५४९ मृत्यू, पुणे- ९६, औरंगाबाद- ५४, सातारा- ५३, सोलापूर- ४२, भंडारा- ३९, अहमदनगर- ३५, वर्धा- ३२, रत्नागिरी- २८, लातूर- २३, यवतमाळ- १८, उस्मानाबाद- १४, पालघर- १४, नाशिक- १३, नांदेड- १२, सांगली- ११, कोल्हापूर-१०, रायगड- १०, ठाणे- १०, वाशिम- ९, नागपूर- ८, जळगाव- ४, बुलढाणा- ३, नंदूरबार- ३, चंद्रपूर- २, परभणी- २, सिंधुदुर्ग- २, अकोला- १ आणि अमरावती- १ असे आहेत.

    सध्या राज्यातील मृत्यूदर १.६४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४३,५०,१८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,९२,९२० (१६.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,५४,९७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १६,०७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ९२४ नव्या रुग्णांची नोंद
    मुंबईत दिवसभरात ९२४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७०२५२२ एवढी झाली आहे. तर ३० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४७५० मृत्यूची नोंद करण्यात आली.