कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय, राज्यात २४ तासांत ‘इतके’ नवे रूग्ण

ओमायक्रॉनबाधितांपैकी ११९ रूग्णांना लसीकरणानंतरही संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संपूर्ण लसीकरणानंतरही ओमायक्रॉनचा धोका असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं.सध्या राज्यात १६७ ओमायक्रॉनबाधीत आहेत. त्यांच्यापैकी ११९ जणांचं संपूर्ण लसीकरण झालंय.

    मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून गेल्या २४ तासांत १ हजार ४२६ नवे रूग्ण सापडले आहेत. तर कालच्या ओमायक्रॉन बाधितांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

    लसीकरणानंतरही धोका
    ओमायक्रॉनबाधितांपैकी ११९ रूग्णांना लसीकरणानंतरही संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संपूर्ण लसीकरणानंतरही ओमायक्रॉनचा धोका असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं.सध्या राज्यात १६७ ओमायक्रॉनबाधीत आहेत. त्यांच्यापैकी ११९ जणांचं संपूर्ण लसीकरण झालंय. त्यामुळे संपूर्ण लसीकरण झाल्यानंतरही ओमायक्रॉन संसर्गाचा धोका असल्याचं स्पष्ट झाले आहे.

    धोका वाढतॊय
    कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर कॅबिनेटमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. गेल्या २० दिवसांत सक्रीय रुग्णांमध्ये ५०% वाढ झालीय. तर गेल्या सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. तेव्हा लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.