कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा (Delta Plus Variant) महाराष्ट्राला(Maharashtra) तितकासा धोका नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे आरोग्य खात्याने म्हटले आहे.

    मुंबई: राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणे(Corona Third Wave) अटळ आहे. पण त्याचा कालावधी आणि परिणामकारकता नेमकी सांगता येणार नाही, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा (Delta Plus Variant) महाराष्ट्राला(Maharashtra) तितकासा धोका नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरुन जाण्याचे कारण नाही, असेही आरोग्य खात्याने म्हटले आहे.

    डेल्टा प्लस व्हेरीयंटचा अभ्यास करण्यासाठी ७ हजार नमुने हे एनआयव्ही आणि नॅशनल सेंटर फॉर सेल्सकडे (NCC ) पाठवण्यात आले आहेत. विषाणुंच्या जनुकीय रचनांचा अभ्यास करून राज्य सरकार उपाययोजना करत आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरीयंट आढळलेल्या रुग्णात गंभीर लक्षणं नसल्याची माहिती राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे. तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. मात्र त्याचा काळ आणि परिणामकारकता आताच सांगणं अशक्य असल्याचे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.


    राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण

    भारतात सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होते आहे. मात्र, कोरोना विषाणू सतत रुप बदलत आहे. कोरोनाच्या बदलत्या व्हेरियंटमुळे चिंता कायम आहे. कोरोना वायरसच्या नव्या रुपाला डेल्टा प्लस हे नाव देण्यात आलं आहे. डेल्टा प्लसला शास्त्रीय नाव AY.1 Variant असं देण्यात आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे २१ रुग्ण आढळले आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची दिली. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्राची चिंतेत वाढ झाली आहे.