मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच, आजचा आकडा काय? : जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाच्या २०५४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा १९५८२ वर पोहोचला आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाच्या २०५४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा १९५८२ वर पोहोचला आहे. मुंबई महापालिकेने आज, शनिवारी कोरोनासंदर्भातील दैनंदिन अहवाल प्रसिद्ध केला.

    दरम्यान मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनाचे २०५४ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या १०, ९२, ५५७ इतकी झाली आहे. तर सध्याच्या घडीला सक्रिय रुग्णांची संख्या ही १३६१३ इतकी झाली आहे.