राज्यात कोरोनाचा कहर सुरुचं; गेल्या 24 तासात आढळले तब्बल इतके रुग्ण

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,249 कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. एकूण कोरोना रूग्णांपैकी 978 रूग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ बघता सर्वांचच टेंशन वाढलं आहे.

    मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर वाढलं आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात कोरोनाने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे.

    गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,249 कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. एकूण कोरोना रूग्णांपैकी 978 रूग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ बघता सर्वांचच टेंशन वाढलं आहे. राज्यात 3,249 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असताना एका दिवसात आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 1 जुलैपर्यंत 23,996 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

    दरम्यान त्यात पावसाळ्यामुळे वेगवेगळ्या आजरांचा प्रसार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. देशात गेल्या 24 तासांत 17 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. देशात 29 रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दुसरूकडे 14,684 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.