कोट्यवधीचे बॅनर लावूनही आमदारांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम : आ. शशिकांत शिंदे

कोरेगाव तालुक्यातील जनतेला पैशाच्या जोरावर मत विकत घेण्याची प्रवृती मोडून काढण्याचा इतिहास कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत घडला असून याचे सर्व श्रेय कोरेगाव तालुक्यातील उत्तर, मध्य व दक्षीण विभातील नेत्यांचा व माझ्या कार्यकर्त्याच्या एकसंघतेचे असल्याचे मत माजी जलसंपदा मंत्री विधापरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

  कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील जनतेला पैशाच्या जोरावर मत विकत घेण्याची प्रवृती मोडून काढण्याचा इतिहास कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत घडला असून याचे सर्व श्रेय कोरेगाव तालुक्यातील उत्तर, मध्य व दक्षीण विभातील नेत्यांचा व माझ्या कार्यकर्त्याच्या एकसंघतेचे असल्याचे मत माजी जलसंपदा मंत्री विधापरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
  कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार महेश शिंदे यांच्यावर खरपूस टीका केली.
  आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, जिल्हा बँक निवडणूक जिंकताना खोके आमदारांनी भरमसाठ पैसा ओतला आणि ते आता या निवडणूकीत माझ्यावर आर्थिक तडजोड केल्याचा आरोप करत आहेत. खरतर याला चोराच्या उलट्या बोंबा असच म्हणावं लागेल. प्रत्येक वेळी आर्थिक गणिते निवडणुका जिंकून देत नाहीत, हे कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत येथील जनतेने दाखवून दिले आहे.
  या निडणुकीनंतर तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचा विश्वास बळावला असून तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  पक्ष मजबूत होत असताना अजूनही काही झारीतील शुक्राचार्य पक्ष विकासात अडसर ठरत आहेत. त्यांचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलेदररोज कोट्यवधी निधीच्या घोषणा
  दररोज कोट्यवधी निधीच्या घोषणा कोरेगावचे आमदार महेश शिंदे करत आहेत. प्रत्यक्षात राज्यात अनेक करोडाे रुपयांची विकास कामे होऊनही त्यांना गेली अनेक वर्ष निधी दिला नाही, ही वस्तस्थिती आहे. त्यामुळे केवळ घोषणा बाजी करणं हेच या आमदाराचे काम आहे, ही गोष्ट आता लोकांच्या लक्षात अाली अाहे. भविष्यात कोरेगाव मतदार संघावर महाविकास आघाडी आपली सत्ता कायम ठेवेल, असा विश्वास अामदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.जिल्हा बँकेत चिंचोके देऊन मते घेतली का?
  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आपण कशी जिंकलात हे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. कोरेगाव तालुक्यात कोणतीही निवडणूक असो आपण ती निवडणूक कशा पद्धतीने लढता, हे सर्वांना माहित आहे. आमच्याकडे मताधिक्य असताना जिल्हा बँकेत आपण काय चिंचोके देऊन मते खरेदी केली होती का ? असले उद्योग आपले आहेत. त्याचे खपर आमच्यावर फोडण्यापेक्षा जनतेने दिलेला कौल मान्य करा, असा सल्ला आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.