Corruption in the work of PM Grameen Sadak Yojana - Allegation of Prahar Sanghatana

तालुक्यातील सर्व रस्त्यांसाठी वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. उपविभागीय बांधकाम अधिकारी जिवती यांना निवेदन तथा तोंडी सुचना देऊन सुद्धा संबंधित ठेकेदारावर कारवाई न करता जैसे थे काम सुरू आहे, असा आरोप तोगरे यांनी केला.

    चंद्रपूर : जिवती तालुक्यातील सध्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्यांची निर्मितीचे काम सुरू आहे. हे काम नियमांचा भंग करून रात्री व शासकीय सुट्टीच्या दिवशी पण केले जात आहे. निकृष्ट दर्जाचे असून रस्ता सहज उखडतो. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून योग्य गुणवत्तेचा रस्ता बनवून द्या, अशी मागणी प्रहार संघटना जीवतीचे प्रमुख जीवन तोगरे, यांनी केली आहे.

    यावेळी सिंधू राठोड, हाकानी शेख व बालाजी शिवमोरे यांची उपस्थिती होती. जिवती हा दुर्गम तालुका आहे. या क्षेत्रात आदिवासी बांधव राहतात. ७० वर्षांपासून लोकांना मजबूत रस्त्यांची प्रतीक्षा होती. किमान ७० कामे आज केली जात आहेत. प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता रात्रीचा वेळेस काम सुरू असताना निदर्शनास आले. रस्ता निकृष्ट दर्जाचा होतो आहे. बांधकाम विभागाचे इंजिनियर तक्रार केली तर, उडवा उडवीचे उत्तर देत फोन कट करतात, असेही ते म्हणाले.

    कामात सुधारणा हवी

    तालुक्यातील सर्व रस्त्यांसाठी वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. उपविभागीय बांधकाम अधिकारी जिवती यांना निवेदन तथा तोंडी सुचना देऊन सुद्धा संबंधित ठेकेदारावर कारवाई न करता जैसे थे काम सुरू आहे, असा आरोप तोगरे यांनी केला. बांधकाम भविष्यात शेतक-यांना त्यांच्या त्रास होणार नाही. म्हणून जिल्हा प्रशासनाने दखल घेत कामात सुधारणा करावी व रात्री काम करू नका, अशी मागणी यावेळी सिंधू राठोड यांनी केली.

    ते रस्ते निकृष्ट दर्ज्याचे नाहीच !

    जिवती तालुक्यातील रस्ते पोलिसांनी, नक्षलग्रस्त भाग म्हणून सुचविलेले रस्ते आहेत. ज्याला रोड कोअर प्रोजेक्ट फॉर लेफ्ट विंग एक्सटिमिस्ट म्हणतात. बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याची चाचपणी विशिष्ठ पथकाद्वारे केली जाते. त्यांचा अहवाल समाधानकारक (एस) असेल तरच बिल दिले जाते. अहवाल समाधानकारक पण सुधारणेची गरज असेल (एसआरआय) दुरुस्ती करून बिल जाते आणि अहवाल असमाधानकारक (यु) असेल तर बिल पूर्णपणे थांबविले जाते. शिवाय या रस्त्यांची ५ वर्ष देखभाल कंत्राटदाराला करायची आहे. अशा अटी असतांना कामाचा दर्जा खालावू शकत नाही. भ्रष्टाचाराचा आरोप तथ्यहीन आहे.

    एस.वी. कुंभे कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, चंद्रपूर.