बनावट नोटा तयार करणारी टोळी ताब्यात; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांची कारवाई

कोल्हापूर (Kolhapur) गगनबावडा जाणारे रोडवर (Road) स्थानिक गुन्हे (Crime) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी (Police) कारवाई करून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून संगणक, प्रिंटर व इतर साहित्यासह क्रेटा कार व मोबाईल असा एकूण १२,६२,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) गगनबावडा जाणारे रोडवर (Road) स्थानिक गुन्हे (Crime) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी (Police) कारवाई करून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून संगणक, प्रिंटर व इतर साहित्यासह क्रेटा कार व मोबाईल असा एकूण १२,६२,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    दि. २०/०१/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकातील पोलीस अमंलदार विजय गुरखे यांना पांढऱ्या रंगाची कारमधून (एमएच ०९ डीएक्स ८८८८) बनावट नोटा घेवून काही इसम कळे-कोल्हापूर रोडने येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे, पोलीस अंमलदार विजय गुरखे, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदूराव केसरे, रणजित पाटील, दिपक घोरपडे, सोमराज पाटील व रफिक आवळकर यांच्या पथकाने कोल्हापूर- गगनबावडा रोडवरील मरळी फाटा (ता. पन्हाळा) येथे सापळा लावला.

    त्यानुसार कार अडवून कारमधील चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (वय ३४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजीत राजेंद्र पवार (वय ४०, रा.गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्विजय कृष्णात पाटील (वय २८, रा. जयभवानी तालमीसमोर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांची कारसह झडती घेतली.

    संगणक, प्रिंटर, कार जप्त

    बनावट नोटा तयार करणारा संदीप बाळू कांबळे (वय ३८, रा. आंबेडकर नगर, कळे, ता. पन्हाळा) याच्या घरामध्ये ४,४५,९०० रुपये किमंतीच्या ५०० व १०० रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. बनावट नोटा तयार करण्याचे संगणक, प्रिंटर व इतर साहित्यासह कार व मोबाईल असा एकूण १२,६२,४८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.