देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार; किलोला मिळतोय ‘इतका’ दर?

अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आणि खरीदरांच्या आग्रहाने देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार उभारला आहे.

    अमरावती : संत्रा उत्पादक शेतकरी बाजार भाव मिळत नसल्याने संकटात सापडला आहे. एकीकडे बांगलादेश मधील निर्यात शुल्क शेतकऱ्यांना परवडणारा नसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात संत्र्याची विक्री करावी लागत आहे. यातच अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आणि खरीदरांच्या आग्रहाने देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार उभारला आहे.

    आंबट गोड चवीसाठी संत्रीची ओळख आहे. विदर्भातील नागपूर आणि अमरावतीत, संत्राच सर्वाधिक उत्पादन घेतलं जाते. संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्याने मात्र संत्रा उत्पादक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशमध्ये विकला जाणाऱ्या संत्राला निर्यात शुल्क जास्त लागत असल्यामुळे विदेशात शेतकऱ्यांना संत्रा विकायला परवडत नाही.

    या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. या ठिकाणी शेतकऱ्यांना संत्र्याच्या गुणवत्तेनुसार भाव ठरवला जातो.

    इतकच नाही तर शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत संत्र्याचे पैसे दिले जातात. यासह शेतकऱ्यांनी आणलेला संत्राला डिजिटल मशीन मध्ये टाकण्यात येते. यामध्ये गुणवत्तेनुसार संत्रा वेगवेगळ्या ठिकाणी गोळा करून याच परिसरात व्यापाऱ्यांकडे संत्रा विकला जातो. यावर्षी संत्र्याला 106 रुपये किलो असा भाव मिळाला असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील शेतकरी संत्रा वरूड बाजार समितीत विकण्यास आणतात. भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आभार मानले आहे.