कोर्टानं शिवसेनेला दसरा मेळाव्यात ‘या’ घातल्या अटी, पालन न केल्यास…

दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्याच दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. त्यामुळं शिंदे गटाला धक्का बसला असून, आता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार असून, उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेचा आवाज घुमणार आहे. परंतु परवानगी देताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत.

    मुंबई : शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. शिवसेनेना (Shivsena) आणि त्यानंतर शिंदे गटानं (CM Eknath Shinde) हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली होती. मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवावगी न देण्याची भूमिका घेतली होती, मात्र आता आज हायकोर्टात (Bombay high court) सुनावणी पार पडली. दरम्यान, दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्याच दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. त्यामुळं शिंदे गटाला धक्का बसला असून, आता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार असून, उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेचा आवाज घुमणार आहे. परंतु परवानगी देताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत.

    या आहेत अटी

    दरम्यान, २ ते ६ ऑक्टोबर ठाकरे गटाला तयारीसाठी मैदान ताब्यात देण्याचे पालिकेला निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच २०१६ च्या अध्यादेशातील नियमाचे पालन करावे लागेल. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर मेळावा सुरू असताना, पोलिसांना गोंधळ अथवा आक्षपार्ह आढळल्यास ते पुढील वर्षी परवानगी देताना विचार करू शकतात. अशा कोर्टानं अटी शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी घातल्या आहेत.