नवनीत राणा जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी कोर्टाने राखून ठेवला निर्णय…नवनीत राणांबाबत पुढील निर्णय १९ डिसेंबरला, ‘या कारणा’साठी राखून ठेवला निर्णय

नवनीत राणांच्या बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई करण्यासाठी मुलुंड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी वेळ मागितला होता. आज न्यायालयाने सुनावणी देताना निर्णय राखून ठेवत, जात प्रमाणपत्र प्रकरणी राणांच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर १९ डिसेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. त्यामुळं यावर आज निर्णय झाला नाही. त्यामुळं न्यायालयाने  निर्णय राखून ठेवला आहे.

    मुंबई – बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा अडचणीत आल्या आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याने शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. खासदार नवनीत राणांवर कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? असा सवाल कोर्टाने विचारला आहे. नवनीत राणांच्या बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई करण्यासाठी मुलुंड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी वेळ मागितला होता. दरम्यान, यावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावर न्यायालयाने  निर्णय राखून ठेवला आहे. दरम्यान, आज न्यायालयाने सुनावणी देताना निर्णय राखून ठेवत, जात प्रमाणपत्र प्रकरणी राणांच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर १९ डिसेंबरला पुढील निर्णय राखून ठेवलाआहे. त्यामुळं यावर आज निर्णय झाला नाही. त्यामुळं न्यायालयाने  निर्णय राखून ठेवल्यामुळं राणांच्या पारड्यात कोणता निर्णय येतो हे पाहावे लागेल.

    काय आहे प्रकरण?

    जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर यावर आज सुनावणी पार पडली असता, कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे.

    राणा सतत चर्चेत

    दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ह्या कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात, मविआ सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर येऊन हनुमान चालीसा म्हणणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यावेळी राणा मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यामुळं खार पोलिसात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळं त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यानंतर बोगस जातप्रमाणपत्र पडताळीमुळं त्यांचा आणखी पाय खोलात गेला आहे. या प्रकरणी आज न्यायालयाने सुनावणी देताना निर्णय राखून ठेवत, जात प्रमाणपत्र प्रकरणी राणांच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर १९ डिसेंबरला पुढील निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळं यावर आज निर्णय झाला नाही. त्यामुळं न्यायालयाने  निर्णय राखून ठेवला आहे.