अविनाश भोसले यांना कोर्टाचा दणका, तीन दिवसांत तुरुंगात पाठवण्याचे आदेश

अविनाश भोसले यांच्या तपासणी करिता विशेष पथक स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या उपचाराला सीबीआयने आक्षेप घेतला होता. पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना 26 मे 2022 रोजी सीबीआयकडून अटक करण्यात आलं आहे.

    मुंबई : डीएचएफएल (DHFL) आणि येस बँक घोटाळा (Yes Bank Scam) प्रकरणी अटकेत असलेले अविनाश भोसले यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण कोर्टाने अविनाश भोसले यांना तीन दिवसांत तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तीन दिवसात जे.जे. हॉस्पिटलमध्ये सर्व तपासणी, चाचणी पूर्ण करून भोसले यांना तुरुंगात पाठवावे, असा आदेश मुंबई सेशन्स कोर्टातील विशेष पीएमएलए कोर्टाने दिला आहे.

    -विशेष पथक स्थापन करण्याची मागणी
    अविनाश भोसले यांच्या तपासणी करिता विशेष पथक स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या उपचाराला सीबीआयने आक्षेप घेतला होता. पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना 26 मे 2022 रोजी सीबीआयकडून अटक करण्यात आलं आहे.डीएचएफएल घोटाळ्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हे मूळ प्रकरण 2018 सालातील आहे. त्यावर्षी एप्रिल ते जूनच्या काळात हजारो कोटी रुपये एका खआत्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले होते. त्यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा सहभाग होता. यात अविनाश भोसले, संजय छाब्रिया, बलवा व गोएंका यांचा समावेश होता. या प्रकरणी गेल्यावर्षी एप्रिलच्या अखेरीस सीबीआने छापेमारीही केली होती. या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. कारण अविनाश भोसले यांचे अनेकांशी राजकीय संबंध असल्याची चर्चा होती.