राज्यात वाढतोय कोरोना! दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याची कोविड टास्क फोर्सची सूचना

राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख वाढताना दिसत आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या 3090 आहे. यामध्ये एकट्या मुंबईत 937 इतके सक्रिय रुग्ण आहे. तर, पुण्यात 726 ठाण्यामध्ये 566 सक्रिय रुग्ण आहेत.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे  (Corona) रुग्ण वाढताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरात नव्या रुग्णांची संख्या आता दुप्पट झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाने चिंता वाढवली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहत महाराष्ट्रा कोविड टास्क फोर्स अर्लट  (Maharashtra Covid Task Force) झालं आहे. या पार्श्वभुमीवर दुबई (Dubai) आणि चीनमधून (China) येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी (Covid Test) करण्याच्या सूचना टास्क फोर्सने दिल्या आहे.

टास्क फोर्सची सूचना काय?

देशात कोरोनाची वाढती संख्या पाहता टास्क फोर्सने राज्य सरकारला काही सूचना केल्याा आहेत. दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढण्याचं प्रमाण अधिक आहे. अशातच मागील काही दिवसांपासून चीन आणि दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणांवरुन येणाऱ्या व्यक्तीची कोरोना चाचणी करावी अशा सूचना टास्क फोर्सने राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने एअरलाईन्ससोबत बोलणी करत चाचणीसंदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहे. सध्या परदेशातून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहेत. यातील पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येकाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाची काय स्थिती

राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख वाढताना दिसत आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या 3090 आहे. यामध्ये एकट्या मुंबईत 937 इतके सक्रिय रुग्ण आहे. तर,  पुण्यात 726  ठाण्यामध्ये 566 सक्रिय रुग्ण आहेत. तर, राज्यात गेल्या 24 तासांत 425, तर मुंबईत 172 कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही वाढ पाहत मुंबई पालिकेकडुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. रुग्णलयाची बेडची क्षमता वाढवणे,  महापालिकेने शहरातील दोन रुग्णालयांसह तीन ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र सुरु करणे या सारख्या उपाययोजनांचा त्यात समावेश आहे.