पिंगळी खुर्दमध्ये अवैध धंद्यांवर कारवाई; दहिवडी पोलिसांकडून कारसह लाखोंचा माल जप्त

पिंगळी खुर्द (ता. माण) येथील राहुल पवार हा अवैध दारूची वाहतूक करून घेऊन जाणार असल्याची खबर दहिवडी पोलिसांनी मिळताच सापळा रचून त्याला मुद्देमालासह पकडण्यात आले आहे. त्याच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

सातारा : पिंगळी खुर्द (ता. माण) येथील राहुल पवार हा अवैध दारूची वाहतूक करून घेऊन जाणार असल्याची खबर दहिवडी पोलिसांनी मिळताच सापळा रचून त्याला मुद्देमालासह पकडण्यात आले आहे. त्याच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना राहुल लालासो पवार (राहणार पिंगळी खुर्द, तालुका माण) बेकायदेशीर दारूची वाहतूक करणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानूसार त्यांनी स्वतः व पोलीस सहकाऱ्यांच्या मदतीने सातारा ते गोंदवले बुद्रुक जाणाऱ्या रोडवर सापळा रचून कारमधून देशी, विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या राहुल लालासो पवार (राहणार पिंगळी खुर्द) यास रंगेहाथ पकडले. त्याच्याकडील ३,५३,७४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांच्यार गुन्हा नोंद करून त्याच्या मुस्क्या आवळल्या.

दहिवडी पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक निर्मळ, सहायक फौजदार प्रकाश हांगे, पोलीस नाईक बनसोडे, वावरे यांनी ही कारवाई केली.