कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायावर छापा; परदेशी तरुणीसह दोघींची सुटका

उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या कल्याणीनगर भागातील तारांकित हॉटेलच्या भागात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी परदेशातील तरुणीसह दोघांना ताब्यात घेतले आहे. तर, पोलिसांनी एका दलालास अटक करण्यात आली.

    पुणे : उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या कल्याणीनगर भागातील तारांकित हॉटेलच्या भागात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी परदेशातील तरुणीसह दोघांना ताब्यात घेतले आहे. तर, पोलिसांनी एका दलालास अटक करण्यात आली.

    करण किशोर यादव (वय ३५, रा. वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, अनिकेत पोटे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

    शहरात अवैध प्रकार बंद करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, सामाजिक सुरक्षा विभाग हद्दीत गस्त घालत असताना कल्याणीनगर भागातील एका तारांकित हॉटेल परिसरात परदेशी तरुणीसह दोघींना करण यादव याने वेश्याव्यवसायासाठी पाठविले होते. याबाबतची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून यादवशी संपर्क साधला. तसेच, माहिती खातरजमा केली. त्यानंतर हॉटेलजवळील भागात छापा लावून पोलिसांनी पकडले.

    चौकशीत त्यांना वेश्या व्यावसायासाठी पाठविण्यात आल्याचे समोर आले. यातील एका तरुणी उझबेकिस्तान देशातील असून, तिच्यासोबत आणखी एका तरुणीला ताब्यात घेतले. यादव ऑनलाइन पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवित होता. त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.