
विजापूर-गुहागर हा राष्ट्रीय महामार्ग जत ते मुचंडीपर्यंत काळ्या शिवारातून गेला असून महामार्गाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. हा रस्ता तत्काळ दुरुस्ती करून दर्जेदार पध्दतीने करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
जत : विजापूर-गुहागर हा राष्ट्रीय महामार्ग जत ते मुचंडीपर्यंत काळ्या शिवारातून गेला असून महामार्गाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. हा रस्ता तत्काळ दुरुस्ती करून दर्जेदार पध्दतीने करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
विजापूर-गुहागर हा राष्ट्रीय महामार्ग काळ्या शिवारातून गेला असून या काळ्या शिवारात ८० फुटापर्यंत खडक लागत नसल्याने पावसाळ्यात या जमिनी भिजून खचतात. काळ्या शिवारातील सिमेंटचा रस्ता जतपासून मुचंडीपर्यंत अनेक ठिकाणी दोन्ही बाजला तडे गेले आहे. दरम्यान महामार्ग कर्मचान्यांकडून याची डागडुजी केली जाते. मात्र पुन्हा वारंवार तेथे तडे जाऊन रस्ता दभंगला जात आहे. काही ठिकाणी मोटरसायकलचे टायर अलगद आत जाईल इतपत मोठे खड्डे व तडे पडल्याचे दिसून येते. काळ्या शिवारात महामार्गाचे काम करताना म्हणावा तसा मुरूम भरून तो रस्ता दर्जेदार होणे अपेक्षित असताना संबंधित ठेकेदाराने मुरुमाचे प्रमाण कमी वापरल्याने काळ्या शिवारात पाऊस पडल्यानंतर रोडला तडे जाण्याचा प्रकार घडत आहे. कोल्हापूरच्या रस्ते विकास महामंडळाच्या अधीक्षक यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून जत ते मुचंडी दरम्यान रोडला पडलेले तडे दुरुस्त करून घ्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.