ऐतिहासिक चित्रपटांसाठी स्वतंत्र ऐतिहासिक कक्ष निर्मिती करा ; मराठा सेवा संघाची मागणी

मूळ इतिहास बाजूला सारून त्याची मोडतोड करून, निमार्ते-दिग्दर्शक यांना वाटेल तसे चित्रपट निर्मिती सुरु आहे.त्यासाठी ऐतिहासिक महानायकांवर आधारित चित्रपट बनवताना त्याला मान्यताप्राप्त करून देण्यासाठी स्वतंत्र ऐतिहासिक कक्ष निर्माण करावा.

    बारामती : मूळ इतिहास बाजूला सारून त्याची मोडतोड करून, निमार्ते-दिग्दर्शक यांना वाटेल तसे चित्रपट निर्मिती सुरु आहे.त्यासाठी ऐतिहासिक महानायकांवर आधारित चित्रपट बनवताना त्याला मान्यताप्राप्त करून देण्यासाठी स्वतंत्र ऐतिहासिक कक्ष निर्माण करावा. त्यामध्ये सर्व इतिहास संशोधकांची नेमणूक करण्यात यावी,अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत मराठा सेवा संघाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.त्यानुसार याबाबत सरकारकडे पाठपुरावा करावा,अशी देखील मागणी मराठा सेवा संघाने पवार यांच्याकडे केली आहे.

    गेल्या काही दिवसापासुन छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यावर प्रकाश टाकणारे चित्रपट येत आहेत. परंतु हे दाखवत असताना कोणत्याही प्रकारचे ऐतिहासिक संदर्भ यांचा अभ्यास न करता चित्रपट बनवत आहेत त्यामुळे मूळ इतिहास बाजूला सारून त्याची मोडतोड करून, निमार्ते-दिग्दर्शक यांना वाटेल तसे चित्रपट निर्मिती करीत आहेत. हे सर्व सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रतील वातावरण बिघडत आहे. हे सर्व प्रकार म्हणजे अप्रत्यक्षपणे महापुरूषांची बदनामी करणे आहे. भविष्यातील सर्व अनुचित प्रकार थांबवावे यासाठी ऐतिहासिक महानायकांवर आधारित चित्रपट बनवताना त्याला मान्यताप्राप्त करून देण्यासाठी स्वतंत्र ऐतिहासिक कक्ष निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राहुल घोगरे,प्रशांत तावरे,समीर मोहिते,प्रमोद देशमुख,प्रविण ननवरे,सचिन शितोळे,सागर जाधव,विक्रांत घोगरे,सचिन घाडगे,विकीराज घाडगे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.