Pune Drugs Connection

    पुणे : शहरात ड्रग्ज पुरवठा (पेडलर) करणाऱ्या परदेशी नागरिकांवर गुन्हे शाखेने मध्यरात्री कारवाई करण्यात आली. पुणे शहरातील १३ ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई केली असून, यामध्ये उंड्री भागातील एका इमारतीचा समावेश आहे. कारवाईत काही नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. पुण्यातून उघडकीस आलेल्या अंतरराष्ट्रीय ड्रग्जप्रकरणानंतर पोलिसांनी ही मोहिम सुरू केली होती.

    पुणे शहरात ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांची यादी तयार

    पुणे शहरात पुरवठा करणाऱ्यांची यादी तयार केली होती. त्यानुसार, पोलिसांनी अचानक मध्यरात्री १३ ठिकाणी छापेमारी करून ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच, काही जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या १० पथकाने ही कारवाई केली. उंड्रीतील एकाच इमारतीत मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिक वास्तव्य करीत होते. त्या ठिकाणीही कारवाई केली आहे.

    नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी

    पुणे पोलिसांनी पहाटेपासून शहरातील विविध भागात कारवाई सुरू केली आहे. कोंढवा, हडपसर, कात्रज, वानवडी या परिसरात असलेल्या नायजेरीयन नागरिकांच्या निवासस्थानावर पोलीस कारवाई करत आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे १० पथके ही कारवाई करत आहेत. नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी सुरू आहे.

    पुणे शहरात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडले

    मागील काही दिवसांपूर्वी पुणे शहरात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. यामुळे संपूर्ण राज्याला हादरवून टाकले होते. याशिवाय या ड्रग्ज प्रकरणाचे नॅशनल इंटरनॅशल कनेक्शन असल्याचं देखील समोर  आलं होतं. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी संपूर्ण देशभरात छापे टाकले होते. कोट्यवधी रूपयांचं ड्रग्ज देखील जप्त केलं होतं.

    पुणे ड्रग्ज प्रकरण

    पुणे शहरात अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना असल्याचं देखील फेब्रुवारी महिन्यात समोर आलं होतं. पोलिसांनी अनिल साबळे आणि युवराज भुजबळ या दोघांना अटक केली होती. त्यांनी कुरकुंभ येथे एमडी बनविण्याचा कारखाना सुरू केला होता. पुणे पोलिसांनी यावर कारवाई करत कंपनी सील केली होती.

    छापेमारीमध्ये चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्स

    पुणे ड्रग्ज प्रकरण्याचं देशभर नेटवर्क पसरलेलं आहे. पुण्यात आणि इतर ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्स मिळून आले होते. अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आरोपींनी टोपण नावे तयार केली होती. आरोपींना ३ महिन्यात २००० किलो एमडी बनवण्याचं टार्गेट दिल्याचं समोर आलं होतं.