बेकायदा हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा

सध्याची तरुणाईकडून सोशल मीडियाचा अतिरेकी वापर केला जात आहे. सोशल मीडिया मधून दहशत निर्माण करण्यासाठी प्राण घातक हत्यारे घेऊन वेगवेगळ्या प्रकारची डायलॉग बाजी करत गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्यात येत आहे.

    निमसाखर : सध्याची तरुणाईकडून सोशल मीडियाचा अतिरेकी वापर केला जात आहे. सोशल मीडिया मधून दहशत निर्माण करण्यासाठी प्राण घातक हत्यारे घेऊन वेगवेगळ्या प्रकारची डायलॉग बाजी करत गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्यात येत आहे.

    इंदापूर तालुक्यातून अशाच प्रकारे बेकायदा हत्यार बाळगल्या प्रकरणी भिगवण पोलीस स्टेशन व वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भिगवण पोलीस स्टेशन अंतर्गत शुभम संजय देवकाते (वय २२ र. मदनवाडी ता. इंदापूर) व तौफिक रियाज शेख (वय २२, रा. भिगवण) प्रभाग क्रमांक २ यांच्या वरती दुचाकीवरुन फिरत असताना बेकायदा बिगर परवाना कोयता बाळगल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तर वालचंदनगर (ता. इंदापूर) पोलीस स्टेशन अंतर्गत स्वप्नील चंद्रकांत गायकवाड राहणार जांब याने तलवारीने केक कापून इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवून दहशत निर्माण केली म्हणून भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी निकम करीत आहेत.