लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी केली अटक; ८ लॅपटॉप व एक मारुती स्विफ्ट कार केली जप्त

सीबीडीतील गणा पाटील उद्यान परिसरात XUV कारमधील काच फोडून वाहनांमधील काही सामान चोरी करताना एक इसमाला पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याजवळ बॅग तपासली असता बॅगेत दोन लॅपटॉप चोरी केलेले आढळून आले.

    नवी मुंबई : सीबीडी पोलिस ठाणे (CBD Belapur Police Station) हद्दीमध्ये वाहनचोरी (Vehicles Theft) व वाहनांच्या काचा फोडून चोरी होत असल्याच्या घटना घडत होत्या. त्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथक नेमण्यात आलं होतं.

    सीबीडीतील गणा पाटील उद्यान परिसरात XUV कारमधील काच फोडून वाहनांमधील काही सामान चोरी करताना एका इसमाला पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याजवळ बॅग तपासली असता बॅगेत दोन लॅपटॉप चोरी केलेले आढळून आले.

    त्याला अटक करून तपास केला असता ०६ लॅपटॉप चोरी केले असल्याचे उघड झाले आहे. एकूण ८ लॅपटॉप व एक मारुती स्विफ्ट कार असा एकूण ५,६०,००० रूपयांचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.