जनरेटर चोरीचा गुन्हा चार तासात उघड, दोघांना अटक; सापळा रचून पोलिसांनी घेतले ताब्यात

सैदापूर (तालुका सातारा) येथे पांढऱ्या रंगाच्या टेम्पो मधून चोरीचा जनरेटर विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार तासाच्या आत कारवाई करून अटक केली.

    सातारा : सैदापूर (तालुका सातारा) येथे पांढऱ्या रंगाच्या टेम्पो मधून चोरीचा जनरेटर विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार तासाच्या आत कारवाई करून अटक केली. शुभम दीपक कडव (वय २२, राहणार गडकर आळी, सातारा व प्रतीक सुभाष मुळे (वय २३, मोळाचा ओढा, सातारा) अशी आरोपींची नावे आहेत.

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिनांक ७ ऑगस्ट रोजी बातमीदारामार्फत एका पांढऱ्या रंगाच्या टेम्पोतून चोरीचा जनरेटर येथील महानुभाव मठ परिसरात विकला जाणार आहे, अशी माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पतंग पाटील, शरद बेबले यांच्या पथकाला तातडीने निर्देशित केले.

    या कारवाईमध्ये लक्ष्मण जगधने,शरद बेबले, लैलेश फडतरे, गणेश कापरे,अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्निल कुंभार, ओमकार यादव, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम यांनी कारवाईत सहभाग घेतला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले आहे.

    सापळा रचून घेतले ताब्यात

    पथकाने महानुभाव मठ सातारा परिसरात सापळा रचून संबंधित टेम्पो अडवला असतात त्यामध्ये निळ्या रंगाचा किर्लोस्कर कंपनीचा जनरेटर आढळून आला. पोलिसांनी जनरेटर सह तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाई करत आरोपींना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.