Cases of atrocities and domestic violence; MNS Navi Mumbai city president Gajajan Kale's pre-arrest bail today

मतांच्या जुळवाजुळवीसाठी अपक्ष तसेच छोट्या पक्षांचा पाठिंबा घेण्यासाठी मविआ व भाजपामध्य चढाओढ दिसत आहे. दरम्यान, राज्यातील चाललेल्या या राजकारणावरुन तसेच एमआयएमने मविआला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर बोचरी टिका केली आहे.

    मुंबई : आज चार राज्यांतील 16 जागासाठी राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या 57 जागांपैकी 41 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे 16 जागांसाठी चुरस रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी खबरदारी म्हणून सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना घोडेबाजार होऊ नये यासाठी हॉटेल्समध्ये ठेवलं आहे. तसेच महाविकास आघाडीनं तसेच शिवसेनेनं एमआयएमचा पाठिंबा घेतल्यामुळं शिवसेनेला टिकेला सामोरी जावं लागत आहे. दरम्यान, यावरुन आता मनसेनं महाविकास आघाडी तसेच शिवसेनेवर शेलक्या शब्दांत टिका केली आहे.

    दरम्यान, जर शिवसेनेनं आमच्याकडे मदत मागितली तर आम्ही विचार करु असं याआधी एमआयएमनं म्हटलं होतं. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत एमआयएम महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. “भाजपाचा पराभव करण्यासाठी एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम राहतील,” असं इम्तियाज जलील यांनी ट्वीटमध्ये म्हणत महाविकास आघाडीला तसेच शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं आहे.

    मनसेची बोचरी टिका

    मतांच्या जुळवाजुळवीसाठी अपक्ष तसेच छोट्या पक्षांचा पाठिंबा घेण्यासाठी मविआ व भाजपामध्य चढाओढ दिसत आहे. दरम्यान, राज्यातील चाललेल्या या राजकारणावरुन तसेच एमआयएमने मविआला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर बोचरी टिका केली आहे. ‘राज्याची शोभा होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे, ‘त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे,’ असं टिव्टमध्ये गजानन काळेंनी म्हटलंय. त्यामुळं मनसेच्या या टिकेला शिवसेना व मविआ कसे उत्तर देणार हे पाहावे लागेल.