raju shetti

बीड जिल्ह्यातील गेवराई या गावातील नामदेव जाधव या ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साखर कारखान्याला ऊस गाळपाला जात नसल्याच्या नैराश्येमुळे त्यांने हे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले आहे. या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे(Criticism of Raju Shetty on Mahavikas Aghadi).

  बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई या गावातील नामदेव जाधव या ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साखर कारखान्याला ऊस गाळपाला जात नसल्याच्या नैराश्येमुळे त्यांने हे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले आहे. या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे(Criticism of Raju Shetty on Mahavikas Aghadi).

  राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून याला सर्वस्वी राज्यकर्ते जबाबदार आहेत. राज्यसरकार आणखी किती मुडदे पाडणार आहे आणि किती मुडद्यांवर राज्य करणार आहे, असा खोचक सवालही शेट्टी यांनी केला आहे.

  ऊस गाळपासाठी सर्वत्र मारले हेलपाटे

  यावेळी शेट्टी म्हणाले, नामदेव जाधव या गेवराई येथील शेतकऱ्याने नैराश्येच्या भरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. दोन एकर उस असणाऱ्या नामदेव जाधवने साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्याकडे, मुकादमाकडे आणि उसतोडणी मशीन मालकाकडे अनेक ऊस गाळप करण्यासाठी अनेक हेलपाटे घातले.

  नैराश्येच्या भरात केली आत्महत्या

  पैशाची मागणी करुन उसतोड करण्यास नकार दिल्याने त्याने नैराश्येच्या भरात आत्महत्या केली आहे. त्यामुळे याला कारणीभूत असणारे मुकादम, अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. खरेतर एक वर्षापूर्वी मराठवाड्यात अतिरिक्त ऊस पिकणार हे सरकारला माहित होते. ज्या पद्धतीने टंचाईच्या काळात जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या विहीरी अधिगृहीत करुन पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देतात.

  शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राज्यकर्ते जबाबदार

  अशाच पद्धतीने बंद साखर कारखाने ताब्यात घेऊन सक्षम यंत्रणेकडे एक वर्षासाठी चालवायला देता येऊ शकते. उपाययोजना करुन जाधव यांचा ऊस गाळपास देता आला असता, परंतु हे करायला सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे अशा निष्पाप शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. याला सर्वस्वी असून राज्यकर्ते जबाबदार असून तुम्ही अजून किती मुडदे पाडणार आहेत हे सांगावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.