आटपाडी तालुक्यात चाऱ्याअभावी गुराढोरांचा हंबरडा..! पाण्याअभावी पिके जळाली, आणखी किती निवडणुका टेंभू योजनेच्या नावावर होणार ?

आटपाडी ता. म्हणलं की दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये पाणी यावे सर्व शेती पाण्याखाली यावी यासाठी क्रांतिवीर नागरिकांना नायकवडी यांनी टेंभू येण्याचे पाणी आटपाडी तालुक्याला मिळाले पाहिजे यासाठी अनेक आंदोलने केली.

    आटपाडी : आटपाडी ता. म्हणलं की दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये पाणी यावे सर्व शेती पाण्याखाली यावी यासाठी क्रांतिवीर नागरिकांना नायकवडी यांनी टेंभू येण्याचे पाणी आटपाडी तालुक्याला मिळाले पाहिजे यासाठी अनेक आंदोलने केली. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या समवेत स्वर्गीय आमदार गणपत आबा देशमुख, डॉ. भारत पाटणकर हेही पूर्वीपासून या लढ्यामध्ये होते. आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्र देशमुख. अशा नावाजलेल्या नेत्यांनी पाणी येण्यासाठी लढा उभा केला. या लढ्यामध्ये पूर्वीपासून डॉक्टर भारत पाटणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर तालुक्यामध्ये आनंदराव पाटील , राजेंद्रअण्णा देशमुख ,साहेबराव चवरे, हनुमंतराव देशमुख व अन्य नेत्यांनी तालुक्याला पाणी मिळावे म्हणून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या लढ्यामध्ये सहभागी झाले .हेच नव्हे तर संपूर्ण तालुका या लढ्यामध्ये सहभागी झाला होता. या लढ्याला कुठेतरी यश येऊन तालुक्यांमध्ये टेंभू योजनेचे काम सुरू झाले होते.

    त्यानंतर अनेक दिवस काम बंद होते  त्यावेळेला माजी आमदार राजेंदरअण्णा देशमुख व आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांना जाबी विचारासाठी टेंभू कार्यावर गेले असता अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार गोपीचंद पडळकर व कार्यकर्ते याणी कार्यालयाची तोडफोड केली व त्यानंतर काम काही प्रमाणात सुरू झाले.

    आटपाडी तालुका म्हणलं का दुष्काळी तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे. काही प्रमाणामध्ये टेंभूचे पाणी तालुक्यामध्ये आले आहे. परंतु ७० टक्के भाग टेंभू योजनेपासून वंचित आहे. अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या परंतु नेत्यांची आश्वासने अद्याप थांबली नाहीत . नेत्यांच्या आश्वासनाप्रमाणे  योजना पूर्ण झाली नाही. सततचा दुष्काळ म्हणून तरुण वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई पुणे येथे मिळेल ते काम करून कसेबसे जगू लागले आहेत. गावाकडे शेतीतून उत्पन्न नाही. घरच्या लोकांना काही कामधंदा नाही. त्यांना दर महिन्याला काही रक्कम द्यायची उर्वरित रक्कम त्या तरुणांनी त्याच्या जगण्यासाठी वापरायची अशी अवस्था या तालुक्यातील तरुणांची झाली आहे.

    पाणी उशाला, पण कोरड घशाला
    सध्या टेंभूचे पाणी उशाला आले आहे. म्हणजेच तालुक्यामध्ये आलेले आहे परंतु 75 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. अनेक वेळा सर्वे होतो, अनेक वेळा आंदोलने होतात, अनेक कार्यकर्ते निवेदन देतात, परंतु टेंभू योजनेचे काम काय पूर्ण होत नाही.

    निवडणुकीत नेत्यांची आश्वासने
    परंतु लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीमध्ये टेंभू योजनेचे पाणी देणारच अशा घोषणा होतात आणि टेंभू योजनेचे नाव पुढे करून नागरिकांना उल्लू बनवून अनेक नेते अनेक दिवसापासून मतदान घेत आहेत.परंतु प्रत्यक्षात आटपाडी तालुका ओलिताखाली आला नाही. ही बाब सर्वांनाच माहित आहे. परंतु लढा उभा करायचा कोणी सध्या तालुक्यांमध्ये आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सतत लढा सुरू आहे. परंतु त्या लढ्यात शेतकरी व नेते मंडळी यांनी सहभागी होण्याची गरज आहे. परंतु असं न होता आंदोलनाची धार कमी झाल्याने टेंभू येजनेचे काम लांबत चालले आहे.

    चारा व पाणी टंचाईमुळे शेतकरी कर्जबाजारी
    सतत चारा टंचाई पाणी टंचाई यामुळे दुष्काळाच्या झळा बसतात परंतु शेतकरी निमुटपणे हे सहन करत असतो. विकास सोसायटी, बँकेचे कर्ज काढले तर फेडायचे कशाने, कारण शेतीतून उत्पन्न नाही .जरी उत्पन्न निघाले तरी त्या पिकावरती कोणता तरी रोगराई येऊन ते पीक वाया जात असते. शेतकरी जगायचे कसे हा मोठा गंभीर प्रश्न बनला आहे.

    शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी योजना हवी
    शेतीसाठी टेंभू याेजनेचे काम पूर्ण होऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी जाईल. त्याच वेळेला शेतकरी शेतीतून उत्पन्न घेऊ शकतो अन्यथा पावसाच्या जीवावर किती दिवस शेती करायची हाही गंभीर प्रश्न आहे. त्यामध्येच खतांच्या व औषधाच्या किमती वाढल्या आहेत शेतकऱ्याला स्वतःचं कुटुंब जगवायचा असते. मुलांचे शिक्षण असते. मुला मुलींची लग्न करायचे असतात याला खर्च आणायचा कुठून ? असा सवाल उपस्थित केला जात अाहे.