
पुणे : यंदा दीपावलीनिमित्त फटाक्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग पाहायला मिळली. यामध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात फटाके खरेदी केल्याचे समोर आले आहे. मागील दोन-तीन वर्षांचा काळ हा कोविडमुळे ग्राहक कमी प्रमाणात असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. परंतु, यंदा फटाक्यांसाठी ग्राहक चांगला आहे. फटाका व्यावयासिकांना चांगला व्यापार असल्याचे मत या व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर यंदा फटाक्यांचे वाढते प्रमाणामुळे हवेतील प्रदूषण वाढल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले
फटाक्यांमुळे यंदा हवेतील प्रदूषण वाढले
मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे या तिन्ही शहरातील हवा बिघडली आहे. तिन्ही शहरातील हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रदूषण न करणारे फटाके फोडण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.
यंदा फटाक्यांसाठी बाजारात तुंबळ गर्दी
यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचे जागोजागी स्टॉल पाहालयला मिळाले. फटाक्यांच्या खरेदी-विक्रीवर तसेच मार्केटमधील फटाका स्थितीवर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. फटाक्यांचे होलसेल व्यापारी, दिलीप देवकर ( Vice President महाराष्ट्र फटाका असोसिएशन) यांच्याशी आम्ही चर्चा करीत फटाक्यांचे पुण्यातील खरेदी-विक्री आणि फटाक्यांपासून सुरक्षिततेचा अहवाल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अवास्तव धाडस दाखवण्याचे टाळावे
यावेळी त्यांनी सांगितले की, मागच्या तीन वर्षांचा काळ वगळता यंदा दिवाळी फटाक्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, त्यांच्या महाराष्ट्र फटाका असोसिएशनकडून नागरिकांना अवाहन करण्यात आले की, फटाका वाजवताना नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेत फटाके वाजवण्यास सांगितले. त्याचबरोबर प्रदूषण टाळण्यासाठी कमीत कमी आणि सोप्या पद्धतीने फटाके वाजवण्यास सांगितले. अवास्तव धाडस दाखवण्याचे टाळावे, असे मत देवकर यांनी व्यक्त केले.
फटाका स्टोअर करण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली
फटाक्यांपासून सुरक्षितता घेण्यासाठी केंद्र सरकारने ठराविक नियमावली जारी केली आहे. तसेच, मोठ्या व्यापाऱ्यांकरिता त्यांच्या गोडाऊनमध्ये केंद्र सरकारने दिलेल्या नियमानुसारच फटाके ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर मोठ्या व्यापाऱ्यांकडून फटाके सुरक्षित ठेवण्याकरिता विशेष काळजी घेतली जात असल्याचे मत देवकर यांनी व्यक्त केले.
तामिळनाडू शिवा काशीद येथे सर्वाधिक कारखाने
महाराष्ट्रासह अनेक राज्यांत येणारा फटाका हा शिवा काशीद (तामिळनाडू) येथून येतो. तामिळनाडू (शिवा काशीद) येथे फटाका व्यापाऱाला चालना देणारे अनुकूल हवामान असल्याने येथेच देशातील सर्वाधिक फॅक्टरी असल्याची माहिती महाराष्ट्र फटाका असोसिएशनचे उपाध्यक्ष देवकर यांनी दिली.