pandharpur vitthal rukmini

माघी यात्रेमध्ये प्रतिवर्षी दोन ते अडीच लाख भाविकांची गर्दी होत असते मात्र यंदा माघी यात्रेमध्ये उच्चांक ही गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. या यात्रेसाठी कर्नाटक, कोकण, आंध्र प्रदेशसह आदी भागातून तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरात सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत.

    पंढरपूर – माघी एकादशीचा सोहळा पंढरपूरला (PANDHARPUR) रंगत आहे. एकादशी दिवशी पहाटे विठ्ठलाची (Vitthal) नित्य पूजा होईल आणि त्यानंतर एकादशीच्या (Ekadahi) सोहळ्यास सुरुवात होईल. यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. तर एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात साडेतीन लाखाहून अधिकचे भाविक दाखल झाले आहे. माघी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना सहज आणि सुलभ पद्धतीने दर्शन व्हावे. यासाठी मंदिर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.

    दरम्यान, दहा पत्रा शेडच्या माध्यमातून सुमारे पाच किलोमीटर पेक्षाही लांब पर्यंत विठ्ठल दर्शनाची रांग जाऊन पोहोचली आहे. भाविकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी मंदिरातील स्वच्छता अशा अनेक प्रकारे मंदिर समितीची यंत्रणा सज्ज झाली आहे. सध्या विठ्ठल दर्शनाची रांग पाच किलोमीटर पर्यंत लांब जाऊन पोहोचली आहे, तर विठ्ठल दर्शनासाठी सुमारे पाच तासांचा कालावधी लागत आहे. माघी यात्रेमध्ये खास करून औसेकर महाराज यांच्या फडाला मोठे महत्त्व असते.

    औसेकरांचे चक्रीभजन हा यात्रेतील मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. माघी यात्रेमध्ये प्रतिवर्षी दोन ते अडीच लाख भाविकांची गर्दी होत असते मात्र यंदा माघी यात्रेमध्ये उच्चांक ही गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. या यात्रेसाठी कर्नाटक, कोकण, आंध्र प्रदेशसह आदी भागातून तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरात सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत. अशी माहिती सहअध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे, ह. भ. प. गहिनीनाथ महाराज, औसेकर यांनी सांगितली.