धुळ्यात क्रुझरचा भीषण अपघात, तीघांचा मृत्यू तर नऊ जण गंभीर जखमी

धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात काल मध्यरात्री ११.३० वाजेनंतर ट्रक, रिक्षा आणि क्रुझर अशा तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात रिक्षातून प्रवास करणार्‍या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले

    धुळे  : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात मध्यरात्री भीषण अपघात (Accident In Dhule) झाला. त्यात तीन जण जागीच ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी हे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तरडी गावातील रहिवासी आहेत.

    धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात काल मध्यरात्री ११.३० वाजेनंतर ट्रक, रिक्षा आणि क्रुझर अशा तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात रिक्षातून प्रवास करणार्‍या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी रिक्षा चालक बराच वेळ ट्रकखाली तसाच अडकून होता. मध्यरात्री उशिरापर्यंत अडकलेल्या रिक्षा चालकाला क्रेनच्या सहाय्याने काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. तर जखमींना धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तरडी येथून सोमवारी रात्रीच्या सुमारास लग्नाचे वर्‍हाड क्रुझरने पुण्यातील खडकी येथे घेवून जात असतांना राष्ट्रीय महामार्ग क्र.३ पुरमेपाडा गावाच्या शिवारातील एका हॉटेल समोर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर गाडी रस्ता दुभाजकाला जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला. यावेळी क्रुझर मधील सुरेश नारायण सोनवणे (वय ६०), शैलेश पंडीत सोनवणे (वय ४), विद्या भुषण काकडे (वय २१), ताराबाई अशोक वसरे (वय ५०), सुपडू बारकु वसरे (वय ५५), कोमल प्रमोद सोनवणे (वय १२), चालक वसंत पंडीत वंजारी (वय २३), सुधीर अभिमन पाटील (वय ५४), अरूणाबाई प्रमोद सोनवणे (वय ३१), आरू भुषण काकडे (वय ३) हे दहा जण जखमी तर सरलाबा सोनवणे (वय ३१), आरू भुषण काकडे (वय ३) हे दहा जण जखमी तर सरलाबाई पंडीत सोनवणे (वय २८), महेंद्र चुडामण पाटील (वय ५१), रईस शेख (वय ४८) रा.मालेगाव यांचा मृत्यू झाला. मात्र अपघात होताच घटनेची माहिती न देताच ट्रक चालक पळून गेला. या प्रकरणी भादंवि कलम ३०४, ३३७ व इतर अनेक कलमान्वये धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.