Worship of the witch began to summon the soul; The body was lying in the house for 20 days Shocking type in Tamil Nadu

- विश्रामबाग पोलिसांकडून दोघांना अटक, घटनेने खळबळ

  पुणे : वैकुंठ स्मशानभूमीत जळत्या चितेजवळ अघोरी पूजा करून जादूटोणा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली अूसन, आईला असणारा कॅन्सरचा आजार बरा होण्यासाठी त्यांच्याकडून हा अघोरी प्रकार करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आला आहे. त्यामुळे पोलीस देखील हैराण झाले असून, याबाबत सखोल तपास केला जात आहे. स्मशानभूमीमधील सुरक्षा रक्षकाने हा प्रकार उघडकीस आणला होता. याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मी निबाजी शिंदे (वय ३१, मुंबई) आणि मनोज अशोक धुमाळ (२२, रा. पुणे) या दोन तृतीयपंथीयांना अटक केली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

  शहरातील प्रसिद्ध वैकुंठ स्मशानभूमीत हा धक्कादायक प्रकार गुरूवारी घडला होता. गुरूवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास दोन व्यक्ती एका जळत्या चितेजवळ पूजा करत असल्याचे येथील सुरक्षा रक्षकाने पाहिले होते. सुरक्षा रक्षकाने तत्काळ ही माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्तळी दाखल होत दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी ते तृतीयपंथी असल्याचे समोर आले. वरिष्ठ निरीक्षक सुनिल माने व त्यांच्या पथकाने या दोघांकडे सखोल तपास केला.

  त्यावेळी त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली. अशोक धुमाळ याच्या आईला कॅन्सरचा आजार आहे. तो आजार लक्ष्मी शिंदे हा बराकरून देणार होता. लक्ष्मी शिंदे हा मुंबईचा आहे. तो दोघेही गुरूशिष्य आहेत. लक्ष्मीने तो आजार दुसऱ्या व्यक्तीच्या अंगात घालवून देतो, असे अशोकला सांगितले होते. त्यामुळे त्यांनी ही पुजा केली. त्यासाठी त्यांनी एक कोंबडी, दहा ते बारा व्यक्तींचे फोटो, काळ्या भाऊल्या, लिंबू, हळद-कुंकू व इतर वस्तू त्याठिकाणी ठेवून त्याची पुजा सुरू केली होती. परंतु, त्यापुर्वीच त्यांना पकडण्यात आले.

  पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी पोलिसांनी कॅन्सरचा आजार बराकरून देण्यासाठी व तो दुसऱ्या व्यक्तीच्या अंगात घालण्यासाठी अशी पुजा केल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस देखील हैराण झाले. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, आणखी तपास केला जात आहे. लक्ष्मी हा पोलिसांना असे शक्य आहे, असे सांगत होता. पण, पोलिसांनी त्याला तेथेच उघडा पाडला. असे काही नसते हे दाखवून दिले.

  दोघांना अटक करून त्यांच्याकडे तपास केला आहे. त्यांनी आणलेले फोटो हे नातेवाईक किंवा ओळखीतील तसेच मयताशी संबंधित नाहीत. त्यांना सापडलेले ते फोटो असावेत. दुसऱ्या व्यक्तींच्या अंगात कॅन्सर जावा यासाठी त्यांनी ही पुजा केल्याची माहिती दिली आहे. परंतु, असे काही नाही. ही चुकीची आणि अघोरीप्रथा असून, त्यांना अटक केली आहे. ते दोघे गुरूशिष्य आहे. मनोज मुंबईला जात होता. त्यातून त्यांची ओळख झाली होती.

  सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे