शिक्रापुरात शेतीसह प्लॉटिंगमध्ये अफूची लागवड; पोलिसांच्या छाप्यात १ हजार २२६ झाडे जप्त

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत असलेल्या महालक्ष्मी नगर परिसरात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने एका शेतीसह प्लॉटिंगमध्ये छापा टाकून अफूची १ हजार २२६ झाडे जप्त केली आहेत. झाडे लावणाऱ्या सुशील शिवाजीराव ढमढेरे व सत्यभामा सुरेश थोरात या दोघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

    शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत असलेल्या महालक्ष्मी नगर परिसरात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने एका शेतीसह प्लॉटिंगमध्ये छापा टाकून अफूची १ हजार २२६ झाडे जप्त केली आहेत. झाडे लावणाऱ्या सुशील शिवाजीराव ढमढेरे व सत्यभामा सुरेश थोरात या दोघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

    शिक्रापूर येथील तळेगाव रोड लगत असलेल्या महालक्ष्मी नगर परिसरात एका इसमाने शेतात तर एका महिलेने घराशेजारी प्लॉटिंगमध्ये अफूच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांना मिळाली, त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, पोलीस नाईक रोहिदास पारखे, किशोर शिवणकर, महिला पोलीस नाईक गिता बराटे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सुशील ढमढेरे याने त्याच्या शेतातील लसूनच्या वाफ्यामध्ये काही अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसले.

    दरम्यान पोलिसांनी येथील अफूची ६६ झाडे जप्त केली, त्यांनतर लगेचच येथील सत्यभामा थोरात यांच्या घराची पाहणी केली असता त्यांनी घराच्या शेजारीच प्लॉटिंगमध्ये तब्बल ११६० अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसून आले, दरम्यान पोलिसांनी सदर झाडे जप्त केली आहेत.