एक खिडकी योजनेच्या परवानगीने समिती स्थापन, गणेश मंडळाच्या सूचना ताबडतोब सोडवणार – दादा भुसे

गणेश विसर्जन मिरवणुकीचा जो मार्ग असतो त्यामार्गावरचं अतिक्रमण नको आणि इतरही सूचना मंडळांच्या वतीने आल्या आहेत

    दादा भुसे यांची पत्रकार परिषद : सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांची आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गणेशोत्सवाच्या अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना दादा भुसे म्हणाले, नाशिक जिल्हा आणि येणारे गणेशोत्सव याचसंदर्भात आढावा बैठक पार पडली. गणेश मंडळांच्या काही चांगल्या सूचना होत्या. प्रामुख्याने शेवटचे चार दिवस जे काही गणेश मंडळ आरास जनतेसाठी खुले करून देतात त्याचा आनंद आणि लाभ घेता आला पाहिजे. त्याचबरोबर गणेश विसर्जन मिरवणुकीचा जो मार्ग असतो त्यामार्गावरचं अतिक्रमण नको आणि इतरही सूचना मंडळांच्या वतीने आल्या आहेत असे दादा भुसे म्हणाले.

    पुढे ते म्हणाले, प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही एक पोलीस प्रशासन, महाप्रशासन, ऊर्जा विभाग याची एक समिती आम्ही १० दिवस गठीत करून त्या त्या भागातील काही मंडळांच्या सूचना आल्या तर त्या सूचना ताबडतोबीने सोडवण्यासाठी समिती गठीत केली आहे. एक खिडकी योजनेच्या परवानगीने समिती गठीत करण्यात आली आहे. गणेश मंडळांना जे काही वीज बिल येत आहे त्या वीज बिलाची आकारणी घरघुती दराने करण्यात येणार आहे १०० युनिटच्या वर जे काही बिल आहे, त्यावरचे जे काही बिल आहे त्याची आकारणी पहिल्या बिलाप्रमाणे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यमुळे हा प्रश्न राज्यव्यापी प्रश्न आहे त्यामुळे हा विषय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांच्याकडे आम्ही नमूद करू असे दादा भुसे म्हणाले.