संजय राऊतांच्या टिकेला दादा भूसेंचे प्रत्युत्तर; आम्ही काल जे होतो तेच आजही आहोत

जोपर्यंत आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो, तेव्हा चांगले होतो. आता मात्र अचानकपणे आम्ही वाईट झालो, असे नसते. आम्ही काल जे होतो तेच आजही आहोत. भविष्यातही आम्ही असेच राहणार, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली.

    मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा (Maharashtra-Karnataka Border) भागाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून उद्धव ठाकरे गटाने आम्ही सीमाप्रश्नासाठी लढा लढू. तुरुंगवास भोगू अशी भूमिका घेतली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील शिंदे गटावर कठोर शब्दात टीका केली. बंडखोर आमदारांचा स्वाभिमान आता कुठे गेला आहे, असा सवाल राऊत यांनी केला. राऊतांच्या या टीकेला मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    जोपर्यंत आम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत होतो, तेव्हा चांगले होतो. आता मात्र अचानकपणे आम्ही वाईट झालो, असे नसते. आम्ही काल जे होतो तेच आजही आहोत. भविष्यातही आम्ही असेच राहणार, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली.

    स्वाभिमानासाठी आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, असे बंडखोर आमदार सांगत होते. मात्र आता बाजुच्या राज्यातील एक मुख्यमंत्री आमची गावे खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरे राज्य आमचे उद्योग खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुमचा स्वाभिमान कोठे शेण खायला गेला आहे. तुम्ही षंढासारखे तुम्ही बसले आहात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.