दादर-पंढरपूर एक्स्प्रेस आता थेट सातारापर्यंत धावणार; कधीपासून सेवा सुरु होणार?

रेल्वेने दादर-पंढरपूर-दादर एक्स्प्रेसचा मिरज-सांगलीमार्गे सातारापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. दादर-सातारा एक्स्प्रेस १५ मार्चपासून दादरहून दर रविवार, सोमवार आणि शुक्रवारी रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.१० वाजता सातारा येथे पोहोचेल.

    पुणे : रेल्वेने दादर-पंढरपूर-दादर एक्स्प्रेसचा मिरज-सांगलीमार्गे सातारापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. दादर-सातारा एक्स्प्रेस १५ मार्चपासून दादरहून दर रविवार, सोमवार आणि शुक्रवारी रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.१० वाजता सातारा येथे पोहोचेल.

    सातारा – दादर एक्स्प्रेस १६ मार्चपासून सातारा येथून दर सोमवार, मंगळवार आणि शनिवारी दुपारी ३.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३५ वाजता दादरला पोहोचेल.

    या गाडीला विस्तारित मार्गावर सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर आणि कोरेगाव हे थांबे असणार आहेत. दादर ते पंढरपूर या दरम्यान गाडीच्या थांब्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

    कळबुर्गी ते बंगळुरू वंदे भारत सुरू

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू ते कळबुर्गी या वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते. या वंदे भारतची नियमित सेवा १५ मार्चपासून सुरू होत आहे. बंगळुरू ते कळबुर्गी वंदे भारत आठवड्यात गुरूवार वगळता इतर दिवशी धावणार आहे. कळबुर्गी ते बंगळुरू वंदे भारत आठवड्यात शुक्रवार वगळता इतर दिवशी धावणार आहे.