शस्त्राच्या धाकाने चोरी करणारा ‘दगड्या’ जेरबंद

धारदार शस्त्राचा धाक दाखवून मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्याचा तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने  शोध घेऊन अटकेची कारवाई केली. प्रतिक उर्फ दगडू दादासो चव्हाण (२०, रा. सावळज) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे, डीबी पथकाने ही  कामगिरी केली.

    तासगाव : धारदार शस्त्राचा धाक दाखवून मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्याचा तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने  शोध घेऊन अटकेची कारवाई केली. प्रतिक उर्फ दगडू दादासो चव्हाण (२०, रा. सावळज) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे, डीबी पथकाने ही  कामगिरी केली.

    याप्रकरणी जरंडी येथील भास्कर आप्पासो शिंदे यांनी फिर्याद दिली होती. या संदर्भात प्रतिक उर्फ दगडू चव्हाण यास अटक करण्यात आली आहे. जरंडी येथील गुहागर-विजापूर रोड जवळ नवीन हॉटेलचे बांधकाम चालू होते. याठिकाणी प्रवीण मास्कर शिंदे हा झोपलेला होता. रात्री दोनच्या दरम्यान प्रतिक उर्फ दगडू चव्हाण याने त्यास धारदार शस्त्राचा धाक दाखवत खिशातील पाकीट व २३०० रुपये रोख रक्कम व सात हजार रूपये किंमतीचा मोबाईल काढून घेतला. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दगडू चव्हाणला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सात हजार किंमतीचा मोबाईल, रोख रक्कम १२०० रुपये असा मुद्देमाल मिळून आला. उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, सहायक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी  नितीन केराम व डीबी पथकाने ही कारवाई केली.