मुंबईत दहीहांडी उत्साहात साजरी; ‘किती’ गोविंदा जखमी माहितेय का? जाणून घ्या आकडा…

दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटींदेखील सहभाग घेतला, तर राजकीय नेत्यांनी देखील दहीहंडीचा आनंद लुटला. तर आरोप-प्रत्यारोंच्या फैरी सुद्धा काल झडल्या. दरम्यान, काल दिवसभरात अनेक गोविंदा जखमी (injured) झाले आहेत. तर काही गोविंदांवर रुग्ण्लयात उपचार सुरु आहेत.

  मुंबई – काल (गुरुवारी) राज्यभरात मोठ्या उत्साहात दहीहंडीचा (Dahi Handi) सण पार पडला. मुंबई, ठाण्यात तर थरावर थर चढवण्यात आले. तसेच गोविंदा पथकांवर लाखो रुपये बक्षिसांची खैरात लावण्यात आली होती. सात थर, आठ थर, नऊ थर असे गोविंदानी लावून मोठी कसरत केली. शेकडो गोविंदा पथकांनी विविध ठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमस्थळी दाखल होत सहभाग नोंदवला आहे. याशिवाय दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटींदेखील सहभाग घेतला, तर राजकीय नेत्यांनी देखील दहीहंडीचा आनंद लुटला. तर आरोप-प्रत्यारोंच्या फैरी सुद्धा काल झडल्या. दरम्यान, काल दिवसभरात अनेक गोविंदा जखमी (injured) झाले आहेत. तर काही गोविंदांवर रुग्ण्लयात उपचार सुरु आहेत. (Dahi Handi celebrated with enthusiasm in Mumbai; Do you know how many injured Govinda? Know the numbers)

  एकूण किती गोविंदा जखमी?

  दरम्यान, काल रात्रीपर्यंत मुंबई व ठाण्यात दहीहांडीचे थर लावण्यात आले. यावेळी मुलांबरोबर मुलींनी देखील दहीहांडीचे थर लावले. काल दिवसभरात ९ थरांचे मनोरे लावण्यात आले. तर ११ लाख, २१ लाख अशी बक्षिसं ठेवण्यात आली होती. पण हे थर लावते वेळी अनेक गोविंदा जखमी झाल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबई व ठाण्यात १३५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आलेय. तर या गोविंदाना विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

  गोविंदावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरु

  • केईएम रुग्णालय – 26 जखमी
  • एसटी जॉर्ज हॉस्पिटल – 1 जखमी (डिस्चार्ज)
  • जीटी हॉस्पिटल – 2 जखमी (1 ओपीडी, 1 डिस्चार्ज)
  • पोद्दार हॉस्पिटल – 4 जखमी (3 उपचाराधीन, 1 डिस्चार्ज)
  • सायन रुग्णालय – 7 जखमी (07 जण उपचाराधीन)
  • नायर रुग्णालय – 3 जखमी (1 ओपीडीमध्ये, दोघांना डिस्चार्ज)
  • जेजे रुग्णालय – 4 जखमी (दोघांना डिस्चार्ज, दोन उपचाराधीन)
  • वी एन देसाई हॉस्पिटल – 2 जखमी (डिस्चार्ज)
  • कुपर हॉस्पिटल – 4 जखमी (डिस्चार्ज)
  • ट्रोमा केअप हॉस्पिटल – 4 जखमी (डिस्चार्ज)
  • BDBA हॉस्पिटल – 7 जखमी ( 1 दाखल, 6 डिस्चार्ज)
  • बॉम्बे हॉस्पिटल – 1 जखमी (उपचाराधीन)
  • राजावाडी हॉस्पिटल – 8 जखमी (2 दाखल, 1 उपचाराधीन, 5 जणांना डिस्चार्ज)
  • शताब्दी हॉस्पिटल – 2 जखमी (डिस्चार्ज)
  • बांद्रा भाभा हॉस्पिटल – 2 जखमी (डिस्चार्ज)