FILE PHOTO
FILE PHOTO

  कोरोना महामारीच्या संसर्गामुळे तब्बल दोन वर्ष साजरा न करता आलेला दहीहंडीचा (Dahihandi) सण यंदा मात्र निर्बंधांच्या शिथिलतेमुळे सर्वत्र उत्साहात साजरा होणार आहे. कृष्ण जन्माष्टमीनंतर आज १९ ऑगस्ट रोजी गोविंदांची पंढरी अशी ओळख असणाऱ्या ठाणे शहरात (Thane) तसेच दहीहंडी नगरी म्हणून प्रसिद्ध असलॆल्या मुंबई (Mumbai) उपनगरात दहीहंडी आमची धामधूम दिवसभर पाहायला मिळणार आहे.

  विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षीस जाहीर करण्यात आल्याने गोविंदा पथकांमध्ये वेगळाच उत्साह संचारला असून महाराष्ट्रभरातील गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत आहे.

  ९ थरांचा विश्वविक्रम यंदा कोण मोडणार?
  दहीहंडी उत्सवावरील उठवलेल्या निर्बंधांमुळे यंदा विविध ठिकाणी गोविंदा पथकांच्या थरांचा थरथराट पहायला मिळणार आहे. ४, ५ पासून ते अगदी ८, ९, १० थर लावण्यासाठी गोविंदा पथकांनी सर्व केलेला आहे. जास्तीत जास्त थर लावता येतील यासाठी मागील दोन महिन्यापासून मुंबईतले नावाजलेला ‘जय जवान’ गोविंदा पथक या भर पावसात सुद्धा दहीहंडी साठी खास तयारी करत आहेत. कारण याच गोविंदा पथकाने आतापर्यंत सर्वाधिक ९ थर लावण्याचा विश्वविक्रम केला आहे.
  शिस्त, सातत्य, मेहनत या बळावर दरवर्षी गोविंदा पथक विशेष छाप पाडतय. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या सरावात सुद्धा या पथकाने चार वेळेस नऊ थर लावले आहेत. त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा उत्तराचा आपलाच विश्वविक्रम मोडीत काढणार का ? याची उत्सुकता प्रत्येकाला असेल.

  ठाण्यात लाखांच्या दहीहंडीचे आकर्षण :

  १. ठाणे – संस्कृती युवा प्रतिष्ठान
  आयोजक – आमदार प्रताप सरनाईक
  बक्षीस- १० थरांसाठी – २१ लाख
  ९ थरांसाठी – ११ लाख
  ८ थरांसाठी – ५० हजार

  २. ठाणे -मनसे दहीहंडी उत्सव
  आयोजक – मनसे नेते अविनाश जाधव
  बक्षीस – १० थरांसाठी – २१ लाख
  ९ थरांसाठी – ११ लाख

  ३. ठाणे – भाजप पुरस्कृत स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव
  आयोजक- शिवाजी पाटील
  बक्षीस- ९ थरांसाठी -११ लाख
  ८ थरांसाठी – २५ हजार
  ७ थरांसाठी- १० हजार

  ४. ठाणे – शिवसेना टेंभी नाका मानाची हंडी
  मार्गदर्शक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  बक्षीस- सर्वाधिक थर लावल्यास मुंबई ठाणे गोविंदा पथकाला प्रत्येकी २ लाख ५१ हजार रुपये
  महिला गोविंदा पथकासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस