दहिवडीच्या महात्मा गांधीच्या विध्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार ; शहरात काकडीत बंद, गोंदवलेत बोंबाबोंब आंदोलन

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरु आहे. या अनुशंघाने सातारा जिल्हा बंदची हाक पुकारण्यात आली होती. यामध्ये माण तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडीमध्ये संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.

    दहिवडी: मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरु आहे. या अनुशंघाने सातारा जिल्हा बंदची हाक पुकारण्यात आली होती. यामध्ये माण तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडीमध्ये संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा समाजाच्या आवाहनाला साथ देवून संपूर्ण बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला.

    दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. आधी आरक्षण मग परीक्षा, आरक्षण नाही तोपर्यंत पेपर नाही अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनि परीक्षेवर बहिष्कार टाकून शाळेच्या प्रवेशव्दारासमोरच आंदोलन केले.

    दगडफेक होऊन नुकसान होणार नाही, प्रवासादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू म्हणून दिवसभर दहिवडी आगारामधून एसटी बसेस सोडण्याचे बंद करण्यात आले होते. गोंदवले बुद्रुक गावच्या मुख्य चौकात मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन सुरु असून या ठिकाणी सामुहिक मुंडण करून बोंबाबोंब करीत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.