जाती धर्माच्या रंगात सरकार गुंतल -प्रताप जाधव

दुग्ध व्यवसाय धोक्यात; आक्रमक झालेल्या शिवसेनेकडून वर्धनगड येथे रास्ता रोको

    वर्धनगड : सातारा जिल्हा पूर्ण दुष्काळ सदृश्य परिस्थितीत आहे. कमी पर्जन्यवृष्टीमुळे पहिली पिके हातातून गेली, आता पूर्ण शेतकरी दूध व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु दुधाचे दर कवडीमोल दराने दूध विकावे लागत आहे. परंतु सरकारला याचे काही घेणेदेणे नाही सरकार जाती-धर्माच्या रंगात गुंतून गेलेला आहे.चाऱ्या अभावी पशुधन शेतकऱ्याकडे राहिले नाही, हातची पिके गेली आहेत.आता फक्त दुग्ध व्यवसाय शेतकऱ्याचा दुवा राहिला आहे. परंतु 27, 28 रुपये लिटर दर आत्ता शासन देत आहे. याचा जमा खर्च काढला असता शेतकऱ्याच्या हातात काही शिल्लक राहत नाही पॅकिंगचे दूध साठ रुपये लिटर नि शेतकऱ्याकडून घेतले जाणारे 27 रुपये लिटर हा कोणता न्याय, शासन यावर गांभीर्य राहिले नाही सातारा जिल्ह्यात अन्न भेसळ विभाग झोपला आहे का? दूध संस्था व खाजगी दूध संस्था यांचे मोठ्या प्रमाणात दूध भेसळ होत आहे, असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

    शेतकऱ्यांच्या उद्रेकास येणाऱ्या काळात सरकारला जावे लागेल अधिवेशनात हा विषय सरकारने गांभीर्याने घेऊन प्रति लिटर 40 रुपये दर शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी सातारा जिल्हा शिवसेनेच्यावतीने आम्ही करत आहोत अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन येणाऱ्या काळात असा इशारा शिवसेनेच्यावतीने देण्यात आलेला आहे यावेळी यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अर्जुन मोहित उप तालुका प्रमुख यशवंत जाधव माजी संपर्कप्रमुख महिपत नाना डोंगरे विभागप्रमुख एम पी कदम वर्धनगड शाखा प्रमुख घोरपडे रिपब्लिकन पार्टीचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत शिवशरण विभाग प्रमुख सुरज वाघ उप तालुका प्रमुख आमीन आगा अजित पाटेकर निखिल राऊत विश्वास नलवडे मोठया संख्येने शिवसैनिक व शेतकरी दूध व्यवसायीक उपस्थित होते.पुसेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांनी. बंदोबस्त ठेवला होता शिवसेनेचे निवेदन येवलेसाहेब यांच्याकडे देण्यात आले. रस्त्यावर दूध ओतून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. दोन दिवसाच्या आत निर्णय घ्या अन्यथा दूध वाहतूक थांबवणार, असल्याचं म्हटलं आहे.