Damage to 799 farmers on 522 hectares of banana due to strong winds in Chopda taluka

चोपडा तालुक्यात गुरुवारी 9 जून रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात चोपडा तालुक्यातील गोरगावले भागातील 17 ते 18 गावांमधील 799 शेतकऱ्यांचे 522 हेक्टर वरती केळी पिकाचे मोठे नुकसान झालं आहे(Damage to 799 farmers on 522 hectares of banana due to strong winds in Chopda taluka).

    जळगाव : चोपडा तालुक्यात गुरुवारी 9 जून रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात चोपडा तालुक्यातील गोरगावले भागातील 17 ते 18 गावांमधील 799 शेतकऱ्यांचे 522 हेक्टर वरती केळी पिकाचे मोठे नुकसान झालं आहे(Damage to 799 farmers on 522 hectares of banana due to strong winds in Chopda taluka).

    या नुकसानीत शेतातील उभी केळीचे पीक पूर्णतः आडवी झोपलेली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेलं आहे. या नुकसानी संदर्भात तहसीलदार यांच्या आदेशाने कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहे.

    सदर नुकसानीच्या प्राथमिक अंदाजानुसार 522 हेक्टर वरील 799 शेतकऱ्यांचे केळी पिकाचे नुकसान झाले असल्याचे कृषी अधिकारी दीपक साळुंके यांनी सांगितले.