दमण-वसईमध्ये लाखो रुपयांचा प्लास्टीक व्यवहार, बंदी घातलेले १५ लाखांचे प्लास्टीक जप्त

सिंगल युज प्लास्टिक, रिसायकल होत नाही, पावसाळ्यात ते वाहत जाऊन गटारे तुंबतात, गुरे खाऊन मरतात. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे

    वसई । रवींद्र माने : बंदी घातलेले १५ ते २० लाखांचे प्लास्टिक वसईतून जप्त करण्यात आले आहे. दमण येथे तयार होणा-या या प्लास्टिकची वसईत दररोज विक्री होत असतानाही महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

    वसईच्या पूर्वेकडील नवघर पुर्व-संभाजीनगरातील एका गाळ्यात १५ लाखांहून अधिक रुपयांचे प्लास्टिक महापालिकेने पकडले आहे. अशी माहिती एड.राहुल सिंग यांनी महापािलकेच्या अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार पालिकेचे सहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांनी धाड टाकून हे प्लास्टिक आणि प्लास्टिक आणणारे टेम्पो जप्त केले. सिंगल युज प्लास्टिक, रिसायकल होत नाही, पावसाळ्यात ते वाहत जाऊन गटारे तुंबतात, गुरे खाऊन मरतात. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे लाखो रुपयांचे प्लास्टिक दररोज वसईत येत असल्याची उपयुक्त माहिती एड.राहूल सिंग यांनी दिली.

    त्यांनतर छापा मारण्यात आल्याची माहिती सुखदेव दरवेशी यांनी दिली. तर बंदी घातलेले लाखो रुपयांचे प्लास्टीक दररोज वसईत येत आहे. दरमहा कोट्यावधी रुपयांचा व्यवहार या बंदी घातलेल्या प्लास्टीकचा होत आहे. रातोरात हे प्लास्टीक येते आणि सकाळी २ तासात त्याची लाखो रुपयांची विक्री होते, अशी माहिती यावेळी एड.राहून सिंग यांनी दिली.