वाशिममध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या फोटोसोबत डान्स; ८ जणांवर गुन्हा दाखल

वाशिम (Washim) जिल्ह्यात मुघल सम्राट औरंगजेबाच्या (Aurangjeb) फोटोसोबत (Photo) नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर मंगरुळपीर पोलिसांनी (Police) 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

    वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यात मुघल सम्राट औरंगजेबाच्या (Aurangjeb) फोटोसोबत (Photo) नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर मंगरुळपीर पोलिसांनी (Police) 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरातील हयात दादा कलंदर दर्गा येथे 1 जानेवारीपासून उरूस साजरा होत आहे. दरम्यान, 14 जानेवारीच्या रात्री संदल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत काही लोक हातात औरंगजेबाचे पोस्टर घेऊन नाचत होते. अशी माहिती पोलिसांनी दिली.

    वृत्तानुसार, संदलमध्ये नाचणाऱ्यांच्या गर्दीत दोन मोठे फोटो उंचावण्यात आले, त्यापैकी एक टिपू सुलतानचा होता. हिंदू संघटनांनी निषेधार्थ औरंगजेबाच्या पुतळ्याचे केले दहन मुघल बादशहाच्या फोटोसोबत लोकांचा नाचण्याचा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदू संघटनांनी विरोध केला.

    दरम्यान काही संघटनांनी औरंगजेबाचा पुतळाही जाळला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत शहरात शांततेचे वातावरण ठेवले आहे. ज्या 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.